Join us

लोकमत समूहाच्यावतीने टायगर श्राॅफची मायकल जॅक्सनला श्रद्धांजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 15:54 IST

आपल्या पॉप संगीताने असंख्य चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकविणारा जगप्रसिद्ध गायक म्हणजे मायकल जॅक्सन... पॉप संगीताचं युग आपल्या नावे लिहिणा-या ...

आपल्या पॉप संगीताने असंख्य चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकविणारा जगप्रसिद्ध गायक म्हणजे मायकल जॅक्सन... पॉप संगीताचं युग आपल्या नावे लिहिणा-या मायकल जॅक्सनच्या स्मृतीदिनानिमित्त या अवलियाचं स्मरण करुन देण्यासाठी लोकमत समूहाने पुण्यातील सिझन मॉलमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  यावेळी मायकल जॅक्सनचा डायहार्ट फॅन असलेल्या टारगर श्रॅाफने खास उपस्थिती लावली होती.तसंच 'मुन्ना मायकल' या सिनेमाची स्टारकास्टही यावेळी उपस्थित होती.टायगर श्रॉफची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.  आपण मायकल जॅक्सनचे डायहार्ड फॅन असल्याचे टायगरनं आपल्या परफॉर्मन्समधून दाखवून दिले आहे. टायगरच्या डान्स स्टेप्स पाहिल्या की रसिकांना मायकलची आठवण होतेच. त्यामुळे या श्रद्धांजली सोहळ्यावेळी टायगर श्रॉफ अवतरताच पुणेकरांनी एकच जल्लोष केला. एकाहून एक सरस परफॉर्मन्स देत टायगरने पुणेकरांची मनं जिंकली. इतकंच नाहीतर पुण्याची शान पुणेरी पगडी परिधान केलेला टायगरचा मराठमोळा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडला.पॉप संगीतावर थिरकताना मायकल जॅक्सनप्रमाणे केलेल्या डान्स स्टेप्स करत टायगरने उपस्थितांना अक्षरक्ष: वेड लावलं. जॅक्सनच्या प्रसिद्ध मूनवॉक आणि रोबोट स्टेप्सवर टायगरनं पुणेकरांनाही थिरकण्यास भाग पाडलं. टायगर श्रॉफचा मायकल जॅक्सनरुपी अवतार पाहून तरुणाईसुद्धा अक्षरक्ष: बेधुंद झाली होती. टायगर श्रॉफ आगामी 'मुन्ना मायकल' सिनेमाच्या गाण्यावरही थिरकला. यावेळी त्याने या सिनेमाविषयी पुणेकरांना माहिती देत पुणेकरांचे आभार मानले. यावेळी त्याने पुण्याच्या खास आठवणींनाही उजाळा दिला.त्यामुळे पुणे आणि आपलं एक खास नातं असल्याचं सांगायलाही तो विसरला नाही.   या खास श्रद्धांजली सोहळ्यामुळे इतक्या वर्षानंतरही मायकल जॅक्सन नावाची जादू रसिकांवर कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.