Join us

साउथच्या या अभिनेत्यानं गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 11:28 IST

1 / 10
दाक्षिणात्य अभिनेता नागा शौर्या(Naga Shourya)ने नुकतेच बंगळुरूस्थित उद्योजिका अनुषा शेट्टीसोबत लग्नगाठ बांधली. 20 नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये पार पडलेल्या सुंदर सोहळ्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2 / 10
नागा शौर्य आणि अनुषा शेट्टीनं गार्डन सिटी बंगळुरूमध्ये लग्नाचे विधी पूर्ण केले. यावेळी दाम्पत्याच्या खास नातेवाईकांनी उपस्थित राहून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
3 / 10
नागा आणि अनुषा दोघीही पारंपारिक पोशाखात सुंदर दिसत होत्या. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
4 / 10
या खास दिवशी अनुषाने लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. नेकलेस, कानातले, नथ अशा पारंपरिक दागिन्यांमध्ये अनुषा खूपच आकर्षक दिसत होती.
5 / 10
तर, नागाने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पारंपारिक धोतर परिधान केले होते. सिंपल लूकमध्ये नागा छान दिसत होता.
6 / 10
त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याचबरोबर सिनेइंडस्ट्रीशी संबंधित लोकही त्यांना सतत शुभेच्छा देत आहेत.
7 / 10
अनुषा शेट्टी इंटीरियर डिझायनर आहे.
8 / 10
नागा शौर्य नुकताच लाइमलाइटमध्ये आला होता. एका शूटिंगदरम्यान त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
9 / 10
त्यावेळी अभिनेता उच्च दर्जाच्या तापाशी लढत होता. मात्र काही दिवसांच्या उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला आहे.
10 / 10
कर्नाटकमध्ये १९ नोव्हेंबर रोजी लग्नाआधीचे कार्यक्रम झाले, त्यात मेहंदी आणि कॉकटेल पार्टीचा समावेश होता.