Join us  

आमिर खानसोबत 'लगान'मध्ये झळकलेली अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब, वळली अध्यात्माकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 1:12 PM

1 / 10
ग्रेसी सिंग ही बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये इंडस्ट्रीतील जवळपास सर्वच स्टार्ससोबत काम केले आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून ती मोठ्या पडद्यापासून गायब आहे.
2 / 10
'लगान' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ग्रेसी सिंग पुन्हा एकदा टीव्हीवर परतली. आज ग्रेसी सिंगचा वाढदिवस आहे. या खास निमित्ताने अभिनेत्रीच्या करिअरवर एक नजर टाकूया.
3 / 10
ग्रेसी सिंगची कारकीर्द काही खास राहिली नाही. तिच्या नावावर मोजकेच हिट चित्रपट आहेत. ग्रेसीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सीरियल 'अमानत'मधून केली होती. काही वर्षे काम केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
4 / 10
१९९९ मध्ये तिने 'हु तू तू' मध्ये काम केले होते, पण हा चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर ग्रेसी सिंह अनिल कपूरच्या 'हम आपके दिल में रहते हैं' या चित्रपटात दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला, पण ग्रेसी सिंगला सर्वाधिक लोकप्रियता 'लगान' (२०२१) या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तिने गौरीची भूमिका साकारली होती.
5 / 10
'लगान' नंतर ग्रेसी सिंगने 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'गंगाजल' सारख्या चित्रपटात काम केले. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यानंतर ग्रेसी सिंगची कारकीर्द बुडू लागली, जी कधीच सावरली नाही.
6 / 10
२००३ मध्ये ग्रेसी सिंगचा 'अरमान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तिने अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांच्यासोबत काम केले होते. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर अभिनेत्रीचे 'चंचल', 'देशद्रोही', 'देख रे देख' एकामागून एक चित्रपट फ्लॉप ठरले.
7 / 10
बॉलिवूडनंतर ग्रेसी सिंगने तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले, पण नशीब चमकले नाही.
8 / 10
२०१३ मध्ये ग्रेसी सिंग ब्रह्माकुमारी वर्ल्ड स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाली आणि तिने तेथील नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली. या अभिनेत्रीने संस्थेसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.
9 / 10
रिपोर्ट्सनुसार, ग्रेसी सिंगने स्वतः तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की ब्रह्माकुमारी वर्ल्ड स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊन तिला शांती आणि आराम वाटत आहे.
10 / 10
ग्रेसी सिंग २०२० मध्ये 'संतोषी मां-सुनये व्रत कथाएं' या टीव्ही सीरियलमध्ये शेवटची दिसली होती. ही मालिका 'संतोषी मां'चा सिक्वेल होती. मात्र, चित्रपटांपासून दूर राहूनही ग्रेसी सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.
टॅग्स :ग्रेसी सिंगआमिर खान