Join us  

Sur Jyotsna Award : पाहा फोटो! लोकमतचे ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ अन् श्रेया घोषालच्या मनमोहक अदा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 10:22 AM

1 / 7
लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत मीडिया ग्रूपतर्पे आयोजित ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये बॉलिवूड सिंगर श्रेया घोषाल हिने हजेरी लावली. नागपुरात रंगलेल्या या ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये श्रेयाने एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली आणि नागपूरकरांना मंत्रमुग्ध केले.
2 / 7
नागपुरात रंगलेल्या याच ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये श्रेयाने ‘घुमर घुमर...’ हे गाणे सादर केले. तिच्या याच गाण्याला सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार जाहिर झाला.
3 / 7
एकीकडे नागपूरकरांनी श्रेयाच्या ‘घुमर घुमर...’ या गाण्यावर ताल धरला आणि दुसरीकडे याच गाण्यासाठी श्रेयाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याची गोड बातमी आली.
4 / 7
सा.रे.ग.म.प. मध्ये स्पर्धक म्हणून आलेली श्रेया या स्पर्धेची विजेती ठरली.
5 / 7
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘देवदास’मधून श्रेयाला गायनाची पहिली संधी तिला दिली आणि या मखमली स्वरांनी लोकांवर जादू केली.
6 / 7
बैरी पिया..., डोला रे..., मोरे पिया..., सिलसिला ये चाहत का... या श्रेयाच्या गीतांची श्रोत्यांना मोहिनी चढली. मग श्रेयाने कधी मागे वळून पाहिलेच नाही.
7 / 7
मेरे ढोलना सुन..., बरसो रे मेघा मेघा..., चिकनी चमेली..., नगाडे संग ढोल बाजे..., तेरी ओर तेरी ओर..., तुझमे रब दिखता है..., मै तैनू समझावा की.. , बाजीराव मस्तानीतील पिंगा ग पोरी पिंगा... पद्मावतचे घुमर.. अशी श्रेयाने गायलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली.
टॅग्स :श्रेया घोषाल