Join us  

Sunny Leone : ‘ॲडल्ट स्टार असल्याने...’, इतक्या वर्षांनंतर सनी लिओनीने बोलून दाखवलं मनातलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 5:34 PM

1 / 8
बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. इंडस्ट्रीत एन्ट्री झाली आणि तिचं नशीब चमकलं. तिला अनेक सिनेमे मिळाले. मोठ्या सिनेमांत आयटम सॉन्गमध्ये तिची वर्णी लागली. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 8
सनी लिओनी नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या 'केनेडी' सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी पोहोचली होती. सनीसाठी हा खूप भावूक क्षण होता कारण ती ज्या बॅकग्राऊंडमधून येते तिथून कान्सपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
ॲडल्ट चित्रपटातील अभिनेत्री ते बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळख मिळवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. एका मुलाखती दरम्यान, सनीने तिच्या आयुष्यातील या बदलाविषयी सांगितले. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
सनी म्हणाली, 'ॲडल्ट एंटरटेनमेंट स्ट्रीममधून 'बिग बॉस'मध्ये येणे आणि नंतर बॉलिवूड चित्रपटात काम मिळणं हे सगळं आपोआप घडत गेले. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
सनी म्हणते की, तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे बदल आणता, एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यापर्यंत कसे पोहोचता, हे तुमच्यावर अवलंबून असते आणि त्यातूनच तुमची इमेज तयार होते. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
सनीने सांगितले की, पॉर्न स्टार ते तिचा बॉलिवूड चित्रपटातपर्यंतचा तिचा प्रवसा सोपा नव्हता. ॲडल्ट मूवी स्टार असल्यामुळे तिला अनेक ब्रँड एंडोर्समेंट आणि चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
तिच्याबद्दल असे अनेक लेख लिहिले गेले होते, ज्यामध्ये तिच्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. पण, सनीने हार मानली नाही आणि ती पुढे गेली. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
‘जिस्म 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणा-या सनीचे आजही देशभर चाहते आहेत. सनीनं एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है, रईस, करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लियोनी आणि रागिनी एमएमएस रिटर्न्स हे सिनेमे केलेत.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :सनी लिओनी