Join us  

मग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो? लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल

By रूपाली मुधोळकर | Published: September 30, 2020 7:49 PM

1 / 10
रंगावरून खिल्ली उडवणा-या हेटर्सवर शाहरूख खानची लेक सुहाना खान जबरदस्त बरसली. काही लोकांनी तिचा सपोर्ट केला. पण काहींनी पुन्हा एकदा तिला ट्रोल केले.
2 / 10
सुहानाने नुकताच इन्स्टावर एक फोटो शेअर केला होता. तिने हा फोटो शेअर केला आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. तिच्या रंगावरून तिची खिल्ली उडवली गेली. या खिल्ली उडवणाºयांना सुहानाने जाम फैलावर घेतले. एक भलीमोठी पोस्ट लिहून तिने आपला संताप व्यक्त केला.
3 / 10
हो मी रंगाने सावळी आहे. माझी उंची 5 फूट 3 इंच आहे, पण मी जशी आहे त्यात आनंदी आहे, असे तिने ट्रोलर्सला सुनावले.
4 / 10
12 वर्षांची असताना तुला रंग सावळा आहे म्हणून तू कुरूप दिसतेस, असे मला म्हटले गेले. विशेष म्हणजे, वयाने प्रौढ म्हटल्या जात असलेल्यांनी मला हे सांगितले. आता काय सांगणार? मुळात आपण सगळेच भारतीय कृष्णवर्णीय आहोत. आपल्या सर्वांचा रंग वेगवेगळा असतो़ तुम्ही तुमचा रंग बदलू शकत नाही, असे सुहाना म्हणाली.
5 / 10
इतकेच नाही तर, हो माझी उंची 5 फूट 3 इंच आहे आणि माझा रंग सावळा आहे. पण तरीदेखील मी आनंदी आहे. माझ्यामते, मी जशी आहे त्यात आनंदी आहे आणि तुम्हालाही आनंदी राहता यायला हवे, अशा शब्दांत तिने रंगावरून ट्रोल करणा-यांना सुनावले.
6 / 10
पण हे प्रकरण इथेच थांबले नाही. काही लोकांनी या पोस्टवरूनही सुहाना खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
7 / 10
रंग बदलत नाही म्हणतेस, मग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो? असा उलट सवाल काही युजर्सनी तिला केला.
8 / 10
अनेक युजर्सनी शाहरूखच्या फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीचे स्क्रिनशॉट्स शेअर करत सुहानाला ट्रोल केले.
9 / 10
आम्हाला सांगून काय फायदा, तु तुझ्या वडिलांना सांग. तो तर पुरूषांच्या फेअरनेस क्रिमची जाहिरात करतो, असे एका युजरने सुहानाला ट्रोल करताना लिहिले.
10 / 10
सुहाना खानने यावर काहीही उत्तर दिले नाही. आता ती यावर काय उत्तर देते, ते पाहूच.
टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान