Join us  

आलिया भटचे अलिशान प्रॉडक्शन हाऊस, पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असे इनसाईड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 3:57 PM

1 / 11
बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट आता केवळ अभिनेत्री राहिली नाही तर निर्माती पण बनलीये.
2 / 11
होय, आलियाने एक नवी प्रॉडक्शन कंपनी सुरु केली आहे. आजच तिने आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.
3 / 11
eternal sunshine असे तिच्या प्रोडक्शन हाउसचे नाव आहे. आलिया अनेक दिवसांपासून स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरु करू इच्छित होती. अखेर तिचे हे स्वप्न पूर्ण झाले.
4 / 11
आलियाचे हे प्रॉडक्शन हाऊस आतून एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखे आहे.
5 / 11
याचे काही इनसाईड फोटो पाहिल्यावर तुम्ही याच्या प्रेमात पडाल. जुहू भागात आलियाने हे प्रॉडक्शन हाऊस उभारले आहे आणि ते अतिशय सुंदर सजवण्यात आले आहे.
6 / 11
कार्यालयाच्या भींतीवर प्रॉडक्शन हाऊसच्या नावाचा लोगो तुमचे लक्ष वेधून घेतो.
7 / 11
प्रॉडक्शन हाऊसचा लिव्हिंग एरिया खूप मोठा आहे. याठिकाणे फर्निवर इतके सुंदर आहे की, तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल.
8 / 11
रूपिन सूचक याने आलियाचे हे ऑफिस डिझाईन केले आहे.
9 / 11
2019 सालात आलियाने प्रॉडक्शन हाऊसची ही जागा खरेदी केली होती. यावेळी आलिया नव्या ठिकाणी राहायला जाणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र आलियाने ही जागा तिच्या ऑफिससाठी घेतली होती.
10 / 11
अगदी दरवाज्याच्या हँडललाही युनिक लूक देण्यात आले आहे. यावरही मांजरीचे साईन आहे.
11 / 11
या ऑफिसमध्ये एक शानदार बाल्कनीही आहे. याठिकाणच्या झाडांनी सजलेल्या कुंड्या आणि झुंबर लक्ष वेधून घेते.
टॅग्स :आलिया भट