Join us

​सोनल चौहान ‘या’ अभिनेत्रीच्या मुलाच्या प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 10:10 IST

सोनल चौहानवरून तुम्हाला काही आठवले? होय,‘जन्नत’मधील इमरान हाश्मीची हिरोईन. फिल्मफेअर डेब्यू अवार्ड जिंकणारी सोनल चौहान सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. ...

सोनल चौहानवरून तुम्हाला काही आठवले? होय,‘जन्नत’मधील इमरान हाश्मीची हिरोईन. फिल्मफेअर डेब्यू अवार्ड जिंकणारी सोनल चौहान सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. अर्थात साऊथच्या चित्रपटांमध्ये ती काम करतेय. तर सोनल अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिचे रिलेशनशिप स्टेट्स. होय, सोनल एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या मुलाला डेट करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, सोनल ज्याला डेट करतेय, तो तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. हा स्टारकिड्स दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू आहे. होय, अभिमन्यू दासानी आणि सोनल चौहान या दोघांच्या डेटींगच्या बातम्या सध्या बॉलिवूडमध्ये चर्चिल्या जात आहे.  अभिमन्यू आणि सोनल दोघेही अलीकडे सर्रास पार्ट्यांमध्ये दिसतात. एका वर्षांपूर्वी अशाच एका पार्टीत दोघेही भेटले होते. यावर्षी फेबु्रवारीत अभिमन्यूने सोनलच्या वाढदिवसाची पार्टी दिली होती. जस्टीन बीबरच्या कॉन्सर्टमध्येही दोघे एकत्र दिसले होते.  ALSO READ : भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज!सोनल चौहानचे नाव याआधीही अनेकांशी जुळले आहे. नील नितीन मुकेश, सिद्धार्थ माल्या यांच्यासोबत तिच्या डेटींगच्या बातम्या कधीकाळी चर्चेत होत्या. या भाग्यश्रीचा लाडका लेक अभिमन्यू लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे. केवळ करणारच नाही, तर त्याने एक चित्रपट सुद्धा साईन केलाय. वसन बालन यांच्या ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात अभिमन्यू दिसणार आहे. अ‍ॅक्शन -कॉमेडीची भरमार असलेला हा चित्रपट अनुराग कश्यपची निर्मिती आहे. यात अभिमन्यूच्या अपोझिट दिसणार आहे, ती राधिका मदन. अभिमन्यू व राधिका या दोघांनी ब-याच दिवसांपासून चित्रपटाची तयारी सुरु केल्याचे कळतेय. कारण या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स आहेत. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करून चुकला आहे. ‘दम मारो दम’ आणि ‘नौटंकी साला’मध्ये त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. सध्या तरी तो आपल्या डेब्यू चित्रपटात व्यस्त आहे.