Join us  

कमल हासनच्या लेकीने चोरली लुंगी, इतकेच नाही तर नेसून दिल्या पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 8:00 AM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन तिच्या बोल्ड फोटोंसाठी नेहमी चर्चेत असते. पण यावेळी ती चर्चेत आहे, लुंगी चोरी केल्यामुळे.
2 / 9
होय, कमल हासनची लेक लुंगी चोरेल, असा विचार तरी कोणी करेल? पण श्रुतीने चक्क एका व्यक्तिची लुंगी चोरली. इतकेच नाही तर ही लुंगी नेसून हॉट पोजही दिल्यात.
3 / 9
श्रुतीने अलीकडेच व्हेकेशन एन्जॉय करताना काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये तिने फ्लॉलर बिकीनी घातली आहे आणि बोल्ड पोज देखील दिली आहे. श्रुतीने शेअर केलेल्या इतर फोटोंवर देखील कमेंट्स येत आहेत, पण फ्लॉलर बिकीनीतील फोटोवरील कॅप्शनवर विशेष कमेंट्स येत आहेत. ‘रंगांमध्ये जगतेय.. तुझी लुंगी चोरण्यासाठी सॉरी..., असे श्रुतीने या कमेंटमध्ये लिहिले आहे.
4 / 9
रेयान स्टीफन या व्यक्तीची लुंगी चोरल्याचे श्रुतीने म्हटले आहे. तिने या पोस्टमध्ये रेयानला टॅग देखील केले आहे.
5 / 9
तु ती (लुंगी) तुझ्याकडे ठेवू शकतेस श्रुतीमा, अशी मजेदार कमेंट रेयानने केली आहे. रेयान एक बॉलिवूड चित्रपट निर्माता आहे.
6 / 9
याआधी देखील अनेक फॅशनेबल आउटफिटमध्ये श्रुतीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
7 / 9
श्रुतीचे व्हेकेशन फोटो देखील कमाल आहेत. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे
8 / 9
श्रुती तिच्या नॅचरल लुक्ससाठी प्रसिद्ध आहे. मेक अप आणि मेकअप शिवाय असे दोन्ही लुक्स तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात
9 / 9
2008 मध्ये ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटातून श्रुतीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. 09/10 यानंतर 2011 मध्ये तेलगू इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. हा सिनेमाही आपटला. पण यानंतर तिने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत.
टॅग्स :श्रुती हसन