Join us

SEE PICS : ​युलिया वेंटरचा सलमान ‘खानदान’सोबत इफ्तार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2017 11:29 IST

रोमानियन ब्युटी युलिया वेंटर ही सलमान खानची ‘खास’ मैत्रिणच नाही तर त्याच्या कुटुंबाचा एक भागही झाली आहे. हेच कारण ...

रोमानियन ब्युटी युलिया वेंटर ही सलमान खानची ‘खास’ मैत्रिणच नाही तर त्याच्या कुटुंबाचा एक भागही झाली आहे. हेच कारण आहे की, ज्यामुळे प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात खान फॅमिलीसोबत युलिया दिसतेच दिसते. काल शनिवारी रात्री युलिया खान फॅमिलीसोबत काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत पोहोचली. सलमान खान, त्याचे वडील सलीम खान, भाऊ सोहेल खान, बहीण अर्पिता, अलवीरा असे सगळेच या पार्टीत होते. त्यांच्यासोबत होती युलिया.या पार्टीत युलिया ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसली. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, या पार्टीत युलिया व प्रिती झिंटा या दोघीही दिसल्या. अगदी काही दिवसांपूर्वी ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सलमान व प्रिती झिंटा एकाच गाडीतून पोहोचले होते. याऊलट युलिया वेगळ्या गाडीतून आली होती. पण या पार्टीत युलिया व प्रिती एकत्र आल्यात.  सलमान खान आणि युलिया वेंटर यांच्यात नेमके सुरु आहे तरी काय? हा प्रश्न अर्थात अद्यापही अनुत्तरित आहे. दोघांचेही ब्रेकअप झाल्याच्या बातम्या असताना अचानक हे दोघे एकत्र दिसतात आणि मग पुन्हा चर्चेचा बाजार गरम होतो. अद्यापही सलमान वा युलिया या दोघांनी आपले नाते जाहिर केलेले नाही. काही महिन्यांपूर्वी अलीकडे सलमान व युलिया दोघेही संपूर्ण कुटुंबासोबत मालदीव येथे हॉली डे एन्जॉय करताना दिसले होते. अनेक पार्ट्यांना दोघेही एकत्र दिसतात. पण तरिही दोघेही रिलेशनशिपवर बोलायला तयार नाहीत. आता खरे काय, हे युलिया व सलमानलाच ठाऊक़ पण युलियाने सलमानच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे, हे मात्र नक्की.