SEE PICS : कॅज्युअल लुकमध्ये स्पॉट झाली श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2017 16:37 IST
अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर खूपच स्टायलिश आणि फॅशनेबल आहे. काल जेव्हा ती विमानतळावर स्पॉट झाली होती, तेव्हा ...
SEE PICS : कॅज्युअल लुकमध्ये स्पॉट झाली श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर!
अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर खूपच स्टायलिश आणि फॅशनेबल आहे. काल जेव्हा ती विमानतळावर स्पॉट झाली होती, तेव्हा तिचा असाच काहीसा अंदाज बघावयास मिळाला होता. कॅज्युअल लुकमध्ये असलेली जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. वास्तविक जान्हवी नेहमीच तिच्या स्टायलिश अंदाजाने बघणाºयांना सुखद धक्का देत असते. यावेळी जान्हवीने पांढºया रंगाचा टॉप आणि स्काय ब्लू रंगाची पॅन्ट घातली होती. ज्यामध्ये ती खूपच कम्फर्टेबल दिसत होती. शिवाय या लुकवर तिने सनग्लासेज घातलेले असल्याने तिचा अंदाज बघण्यासारखा होता. जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार जान्हवी दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर याच्या चित्रपटातून डेब्यू करण्याची शक्यता आहे. त्याचा हा चित्रपट सुपरहिट मराठी चित्रपट ‘सैराट’चा रिमेक असेल. या चित्रपटात जान्हवीच्या अपोझिट शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बघावयास मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी या दोघांना एकत्र मुव्ही डेटला जाताना बघण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच जान्हवी करणच्या पार्टीतही सहभागी झाली होती. या पार्टीत करणचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार जान्हवीने पार्टीत रणबीर कपूरसोबत क्वालिटी टाइम व्यतीत केला होता. जान्हवी रणबीरसोबत जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. खरं तर जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूचे वडील बोनी कपूर यांनीच कन्फर्म करताना म्हटले होते की, ती करण जौहरच्या चित्रपटातूनच डेब्यू करणार आहे. मात्र ती नेमक्या कोणत्या प्रोजेक्टचा भाग बनणार याविषयी मात्र कुठलीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. मोस्ट पॉप्युलर स्टार किड्सपैकी जान्हवी एक असून, सोशल मीडियावर तिची फॅन्स फॉलोइंगची संख्या प्रचंड आहे. तिने लवकरच पडद्यावर झळकावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा असेल.