SEE PICS : विमानतळावर एकत्र स्पॉट झाले रणबीर कपूर अन् कॅटरिना कैफ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 18:56 IST
सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत. दररोज हे एक्स ...
SEE PICS : विमानतळावर एकत्र स्पॉट झाले रणबीर कपूर अन् कॅटरिना कैफ!
सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत. दररोज हे एक्स कपल कुठे ना कुठे जात असून, त्यांची इच्छा नसतानाही दोघांना एकत्र यावे लागत आहे. काल रात्री हे दोघेही विमानतळावर एकत्र स्पॉट झाल्याने त्यांच्या चेहºयावरील तणाव स्पष्टपणे दिसत होता. पांढºया रंगाचा टॉप स्कर्ट आणि निळ्या रंगाचे डेनिम जॅकेट असा कॅटचा अवतार होता. यावेळी तिने स्टायलिश चष्मा आणि टोपीही घातली होती. तर रणबीर काहीसा संजूबाबाची स्टाइल मारताना दिसत होता. दोघेही प्रमोशनसाठी बाहेर गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘जग्गा जासूस’ हा पहिला असा चित्रपट आहे, ज्यास रणबीर कपूरने प्रोड्यूस केले आहे. ज्यामुळे रणबीर सध्या या चित्रपटाबाबत अधिक गंभीर आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडच्या शंभर वर्षांच्या इतिहासात हा एकमेव असा चित्रपट आहे, जो म्युझिकल आहे. ज्यामुळे या चित्रपटाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रणबीरने तर कॅटसोबतचा वाद विसरून तिला सोबत घेऊन प्रमोशन करीत आहे. मात्र अशातही दोघांमधील दुरावा कायम आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर आणि कॅट त्यांचा हा चित्रपट प्रमोट करण्यासाठी सिंगिंग रिअॅलिटी शो सारेगमपा लिटिल चॅम्पच्या व्यासपीठावर पोहोचले होते. या व्यतिरिक्त ही जोडी ‘सबसे बडा कलाकार’च्या सेटवरही पोहोचली होती. या शोला रविना टंडन, बोमन ईरानी आणि अर्शद वारसी जज करीत आहेत. या दोन्ही शोमध्ये ही जोडी भरपूर धमाल करताना बघावयास मिळाली होती. शिवाय प्रेक्षकांचेही त्यांनी चांगलेच मनोरंजन केले होते. दरम्यान, ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट येत्या १४ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले असून, ट्रेलरमध्येच नकळतपणे संपूर्ण कथा सांगितली आहे. ‘बर्फी’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक अनुराग बासू आणि रणबीर दुसºयांदा एकत्र काम करताना बघावयास मिळत आहेत. प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता असून, निर्मात्यांनादेखील चित्रपटातून बºयाचशा अपेक्षा आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांना कितपत खरा उतरेल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.