SEE PICS : रिमझिम पावसात करिना कपूरचा पहिला किस ‘अमृता आरोरा के नाम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 22:36 IST
मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे, परंतु अशातही अभिनेत्री करिना कपूर-खान आणि अमृता अरोरा ...
SEE PICS : रिमझिम पावसात करिना कपूरचा पहिला किस ‘अमृता आरोरा के नाम’
मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे, परंतु अशातही अभिनेत्री करिना कपूर-खान आणि अमृता अरोरा यांनी जीम गाठत वर्कआउट केले. परंतु आजचा दिवस काहीसा स्पेशल असल्याने दोघींनी मस्तीच्या मुडमध्ये पाऊस एन्जॉय केला. करिनाने तर चक्क अमृता अरोरा हिला किस करीत पावसाचा आनंद घेतला. सुरुवातीला या दोघींनी अगोदर जीमला जाणे पसंत केले. त्यानंतर जेव्हा या दोघी जीमच्या बाहेर आल्या तेव्हा त्यांनी माध्यमांना पोझ देत काही मस्तीच्या अंदाजातील फोटोशूट केले. अमृता करिनाची जीम पार्टनर असून, ती नियमितपणे करिणासोबत जीमला जात असते. दोघीही कधीच जीममध्ये खंड पडू देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील दोस्ताना जबरदस्त आहे. असो, दोघींच्या फोटोशूटविषयी सांगायचे झाल्यास, यंदाच्या पावसाळ्यातील करिनाचा हा पहिलाच किस अमृताच्या नावे असावा. खरं तर करिनाच्या जिद्दीचे कौतुक करायला हवे. तैमूरच्या जन्मानंतर करिनाचे वाढते वजन तिच्यासाठी चिंतेचा विषय बनला होता. परंतु तिने केवळ जिद्दीच्या जोरावर वजन कमी केले. शिवाय ती आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविण्यासाठी तयार आहे. लवकरच ती ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. वास्तविक करिना, करिष्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा, सुष्मिता सेन या अभिनेत्री आरोग्याविषयी नेहमीच सतर्क राहिल्या आहेत. त्यामुळे त्या नेहमीच जीम किंवा योगा क्लासच्या बाहेर पडताना स्पॉट होतात. पाऊस असो वा थंडी त्याची तमा न बाळगता या अभिनेत्री जीम जाणे पसंत करतात. त्यामुळेच अजूनपर्यंत त्यांच्या सौंदर्याची जादू बॉलिवूडकरांवर कायम आहे.