SEE PICS : मम्मीसोबत मुंबईची सैर करायला निघाली चिमुकली मीशा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 22:13 IST
एकेकाळी आपल्या मुलीला मीडियापासून दूर ठेवणाºया अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे दाम्पत्य आता बिनधास्तपणे मीशाला घेऊन फिरताना ...
SEE PICS : मम्मीसोबत मुंबईची सैर करायला निघाली चिमुकली मीशा!!
एकेकाळी आपल्या मुलीला मीडियापासून दूर ठेवणाºया अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे दाम्पत्य आता बिनधास्तपणे मीशाला घेऊन फिरताना दिसतात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मीशाची झलक दाखविणारे फोटोज् आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. आता मीशा मम्मी मीरासोबत मुंबईची सैर करायला निघाली असून, यावेळचे तिचे असेच काहीसे क्युट फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीरा जीममध्ये एकत्र जात असताना स्पॉट झाले होते. मात्र मधल्या काळात शाहिदच जीममध्ये बघावयास मिळाल्याने मीराला कदाचित मीशाचा सांभाळ करावा लागत असल्याने दररोज जीमला येणे शक्य होत नसेल. खरं तर मीरा मीशाच्या पालनपोषणात कुठलीच कमतरता ठेवू इच्छित नसल्यानेच तिने जीमला न जाण्याचा निर्णय घेतला असावा. शिवाय तिने मीशाला नेहमीच अधिकाधिक वेळ देण्याचे ठरविले असल्याने शाहिदला जीमसाठी मीराची कंपनी मिळणे दुरापस्त झाले आहे. जेव्हा शाहिद त्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो तेव्हा मीरा आपल्या चिमुकलीला मुंबईची सैरदेखील करवून आणते. नुकत्याच या मायलेकी एका रेस्तरांमध्ये स्पॉट झाले होते. यावेळी मीशा अतिशय क्युट दिसत होती. आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये मीशाचा लुक लळा लावणारा होता, तर मीरा पांढरे शर्ट आणि निळ्या जिन्समध्ये बघावयास मिळाली. या दोघींच्या एका फोटोमध्ये तर मीशा चक्क फोटोग्राफर्सकडे बघताना दिसत आहे. सध्या मीशा दहा महिन्यांची झाली असून, मम्मी-पप्पाची प्रचंड लाडकी आहे. शाहिद तर आपल्या कितीही व्यस्त शेड्यूल्डमधून तिच्यासाठी वेळ काढत असतो. शिवाय शक्य होईल तेव्हा तो तिच्यासोबत फिरायलादेखील जातो. सध्या शाहिद त्याच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात त्याच्याबरोबर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या मुख्य भूमिका आहेत.