Join us  

SEE PICS: ‘बाहुबली’ प्रभास आहे इतक्या कोटींचा मालक, असे जगतो लक्झरी लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:49 AM

1 / 9
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या दोन चित्रपटांमुळे लोकप्रियतेचे अत्त्युच्च शिखर गाठणारा अभिनेता प्रभास याचा आज (23ऑक्टोबर) वाढदिवस. आज प्रभासचे देशात नाहीत तर जगभर चाहते आहेत. साहजिकच, प्रभासबद्दलची बित्तंमबातमी जाणून घेण्यास चाहते उत्सूक आहेत. प्रभासबद्दलच्या अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 9
प्रभास हे त्याचे खरे नाव नाही.‘बाहुबली’ प्रभासचे खरे नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपट्टी आहे. प्रभासची कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेमाची आहे. त्याचे वडील सूर्यनारायण राजू निर्माते आहेत. तर काका उप्नापती कृष्णम राजू टॉलिवूड स्टार आहेत. प्रभासला एक मोठा भाऊ व मोठी बहीण आहे. त्याचा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
3 / 9
अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची भूमिका साकारणारा प्रभास ख-या आयुष्यात इंजिनीअर आहे. त्याने हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून बीटेक केले आहे. पण प्रभासला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे होते. म्हणजेच प्रभास आहे इंजिनिअर, त्याला करिअर करायचे होते हॉटेल इंडस्ट्रीत आणि तो झाला अभिनेता. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला होता.
4 / 9
प्रभासने 2002 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ईश्वर’ या तेलुगु सिनेमातून आपल्या सिने कारकिदीर्ची सुरुवात केली आहे. अनेक जण प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसले आहेत. पण प्रभासने एका हिंदी चित्रपटातही काम केले आहे. होय, अजय देवगणच्या ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’मधील एका गाण्यात तो दिसला होता.
5 / 9
प्रभास दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील पहिला कलाकार आहे, ज्याचा मेणाचा पुतळा बँकॉकमधील मादाम तुसाँ म्युझियममध्ये आहे. हा पुतळा अमरेंद्र बाहुबलीच्या रुपातील आहे.
6 / 9
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानप्रमाणेच प्रभासही वर्षाला एकच चित्रपट करतो. प्रभास राजकुमार हिरानींचा मोठा चाहता आहे. त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘ह्य3 इडियट्स’20 हे चित्रपट वेळा पाहिले आहेत.अख्ख जग प्रभासचे चाहते असताना, बॉलिवूडमधील शाहरुख आणि सलमान त्याचे हे आवडते कलाकार आहेत. तर हॉलिवूडमधील रॉबर्ट डिनीरो यांचा तो मोठा फॅन आहे.
7 / 9
प्रभासने अजून लग्न केलेले नाही. आतापर्यंत त्याने 6000 लग्नाचे प्रस्ताव धुडकावले आहेत.
8 / 9
बाहुबली सिनेमासाठी बलदंड शरीर कमावण्यासाठी प्रभासने घरातच व्हॉलीबॉल कोर्ट बनवले होते, जेणेकरुन तो कधीही वर्कआऊट करु शकतो आणि आवडता खेळही एन्जॉय करु शकतो.बाहुबलीसाठी प्रभासने 30 किलो वजन वाढवले होते. चार वर्ष हा लूक कायम ठेवणे त्याच्यासाठी मोठे आव्हान होतं. या चार वर्षांत त्याने नको इतके चिकन आणि अंडी खाल्ली होती.
9 / 9
मीडिया रिपोर्टनुसार प्रभासकडे एकूण 129 कोटी रुपयांची संपत्ती आहे. हैदराबादमधील जुबली हिल्स या उच्चभ्रू वस्तीत त्याचा आलिशान बंगला आहे. फिल्म नगरीतही त्याचा एक बंगला आहे. 60 कोटींच्या एका फार्म हाऊसचा तो मालक आहे. इतर दाक्षिणात्य सुपरस्टारप्रमाणे प्रभासलाही महागड्या गाड्यांची आवड आहे. तब्बल आठ कोटी रुपये किंमत असलेली रोल्स रॉयल फँटम कार त्याच्याजवळ आहे. या व्यतिरिक्त त्याच्याकडे इटह, रेंजरोवर अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्या जिमची किंमतच 1.5 कोटी आहे.
टॅग्स :प्रभास