see photos : मिलिंद सोमणही पडला अर्ध्या वयाच्या तरूणीच्या प्रेमात!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 15:46 IST
दिग्दर्शक- अभिनेता अनुराग कश्यप त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान मुलीच्या प्रेमात पडला. अनुराग व त्याची लेडी लव्ह शुभ्रा शेट्टी या ...
see photos : मिलिंद सोमणही पडला अर्ध्या वयाच्या तरूणीच्या प्रेमात!!
दिग्दर्शक- अभिनेता अनुराग कश्यप त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान मुलीच्या प्रेमात पडला. अनुराग व त्याची लेडी लव्ह शुभ्रा शेट्टी या दोघांचे इंटिमेट फोटो आपण काल-परवाच बघितले. आता ‘आयर्न मॅन आॅफ इंडिया’ आणि अभिनेता मिलिंद सोमण याच्याही लेडी लव्हचे फोटो समोर आले आहेत. स्वत:पेक्षा बºयाच लहान तरूणीसोबत मिलिंद सोमण रिलेशनशिपमध्ये असल्याचे कळतेय. मिलिंदच्या या कथित लेडी लव्हचे नाव आहे, अंकिता कोनवार. ५१ वर्षांच्या मिलिंदचे अंकितासोबतचे फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. एकंदर काय तर मिलिंदच्या आयुष्यात नव्याने प्रेम परतले आहे. अंकितासोबत मिलिंद कमालीचा आनंदी दिसतो आहे. केवळ आनंदीच नाही तर आपल्या रिलेशनशिपबद्दल दोघेही सिरिअस असल्याचेही यातून स्पष्ट होतेय. आता केवळ मिलिंद या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा कधी करतो, हेच बघायचे आहे. अंकिता ही पेशाने एअर होस्टेस असल्याचे कळतेय. मिलिंद व अंकिता गतवर्षी आक्टोबरपासून एकमेकांना डेट करत असल्याचे समजतेय. मिलिंदने अंकितासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केवळ इतकेच नाही तर या फोटोंना ‘फॉरऐवर’ असे कॅप्शन दिले आहे. ‘या व्यक्तीवर प्रेम आहे,’ असे सांगून त्याने अंकितावरच्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. ALSO READ : ‘गर्लफ्रेन्ड’ शुभ्रा शेट्टीसोबत इंटिमेट होताना दिसला अनुराग कश्यप!सुपरमॉडेल, अभिनेता, निर्माता अशी मिलिंदची ओळख आहे. २००६ मध्ये मिलिंद सोमणने फ्रेंच अभिनेत्री मिलेन जम्पनोइ हिच्यासोबत लग्न केले होते. अर्थात हे नाते फार काळ टिकले नाही. मिलिंद ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात अखेरचा दिसला होता. सध्या मिलिंद फिटनेस प्रमोटर आहे. १९ जुलै २०१६ रोजी मिलिंदने आयर्न मॅन कॉन्टेस्ट जिंकले होते. ३.८ किमी स्विमींग, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग १५ तास १९ मिनिटांत पूर्ण करत त्याने हा किताब आपल्या नावावर केला होता.