Join us

​पाहा: नील नितीन मुकेश आणि रूक्मिणी सहाय यांचा प्री-वेडिंग अल्बम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 13:00 IST

अभिनेता नील नितीन मुकेश याचे लग्न आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. पण त्याआधी नील व त्याची मंगेतर रूक्मिणी ...

अभिनेता नील नितीन मुकेश याचे लग्न आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. पण त्याआधी नील व त्याची मंगेतर रूक्मिणी सहाय यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे काही फोटो तुम्ही पाहिलेत पाहिजेत. ब्लँक अ‍ॅण्ड व्हाईट स्टाईलमध्ये केलेल्या या फोटोशूटमध्ये नील आणि रूक्मिणी दोघेही अतिशय सुंदर दिसत आहे. या जोडीत बहरू लागलेले प्रेमही स्पष्टपणे दिसत आहे. दोघेही जणू सूरज बडजात्याच्या कुठल्याशा सेटवर आहेत, असा भास हे फोटो पाहताना होतोय.गतवर्षी आक्टोबरमध्ये दस-याच्या शुभमुहूर्तावर नील आणि रूक्मिणी यांचा सारखरपुडा पार पडला होता. गतवर्षी गणेशोत्सवादरम्यान नीलचे वडील आणि गायक नितीन मुकेश यांनी मीडियाशी बोलताना, बाप्पाने यावर्षी आमच्या घरी नीलच्या लग्नाच्या रूपात नवा आनंद घेऊन यावा, अशी कामना व्यक्त केली होती. बाप्पाने मुकेश यांची ही कामना पूर्ण केली आहे.येत्या ९ फेबु्रवारीला उदयपूर येथे नील व रूक्मिणी यांचा ग्रँड लग्नसोहळा पार पडणार आहे. ७ फेबु्रवारीपासून या विवाह सोहळ्यांच्या विधींना सुरुवात होईल. या दोघांचा साखरपुडा अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता. पण उदयपूरमध्ये होणाºया लग्नसोहळ्यात मात्र बॉलिवूडचे अनेक दिग्गज सामील होणार आहे.अलीकडे नील व रूक्मिणीचे वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लग्न पत्रिकेवरील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे १९७२ साली प्रदर्शित झालेल्या ‘शोर’ या चित्रपटातील ‘इक प्यार का नगमा है..’ हे गाणे. नीलचे आजोबा आणि प्रसिद्ध गायक मुकेश यांनी स्वरबद्ध  केलेल्या या गाण्याच्या काही ओळी नील-रुक्मिणीच्या पत्रिकेवर छापण्यात आल्या आहेत.  सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आणि अभिनेता नील हा अलीकडे ‘वजीर’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय ‘प्रेम रतन धन पायो’, ‘आ देखे जरा’, ‘प्लेअर्स’,‘शॉर्टकट रोमियो’, ‘न्यूयॉर्क’ व ‘जॉनी गद्दार’ मध्येही तो दिसला होता.ALSO READ :नील नितीन मुकेश दिसणार मधूर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकारमध्ये’नील नितीन मुकेशने उरकला साखरपुडा!