Join us  

Photos: दो दिल मिल रहें है...! विजय देवरकोंडा व सारा अली खान यांच्यात नेमकं शिजतंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 4:28 PM

1 / 9
नवाब सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान कधीकाळी कार्तिक आर्यनच्या प्रेमात वेडी झाली होती. मध्यंतरी या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात होत्या. पण आता सारा एका साऊथ सुपरस्टारच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. हा साऊथ सुपरस्टार कोण तर तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा. होय, काही दिवसांपूर्वीच सारा व विजयच्या एका फोटोने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.
2 / 9
सारा व विजयचा फोटो तुफान व्हायरल झाला होता आणि यानंतर सारा व विजय यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चाही सुरु झाली होती.
3 / 9
कालपरवा मनीष मल्होत्राच्या घरी पार्टी झाली आणि या पार्टीतील फोटो पाहून सारा व विजयच्या रिलेशनशिपच्या चर्चेला पुन्हा उधाण आले.
4 / 9
सारा व विजय यांच्यातील केमिस्ट्री पाहून हे दोघे एकमेकांना डेट करताहेत का? असा प्रश्न सर्वांना पडला.
5 / 9
सारा व विजय एकाचवेळी पार्टीला पोहोचले आणि एकमेकांना बघताच दोघांनीही मिठी मारली.
6 / 9
सध्या या पार्टीतील सारा व विजयच्या केमिस्ट्रीचीच चर्चा आहे.
7 / 9
सूत्रांचे मानाल तर विजय देवरकोंडा आणि सारा अली खान या दोघांनी पार्टीत धम्माल मस्ती केली.
8 / 9
अख्ख्या पार्टीत सारा विजयच्या अवतीभवती होती. दोघांनीही एक क्षणही एकमेकांना एकटे सोडले नाही.
9 / 9
अगदी आत्ता या क्षणात दोघात काहीतरी शिजतेय, असे म्हणता येणार नाही. पुढे काय होते ते बघूच.
टॅग्स :सारा अली खानविजय देवरकोंडा