Join us  

सानिया मिर्झा की शोएब मलिक? कोणाची संपत्ती आहे जास्त? जाणून घ्या दोघांची प्रॉपर्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 6:55 PM

1 / 11
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सानियाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर असलेल्या शोएबने तिसऱ्यांदा संसार थाटला आहे.
2 / 11
शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री असलेल्या सना जावेदशी निकाह करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या काही दिवसांपासूनच सानिया आणि शोएबमध्ये बिनसल्याच्या चर्चा होत्या.
3 / 11
सानियाने शोएबसोबतचे सगळे फोटोही तिच्या सोशल मीडियावरुन डिलीट केले होते. त्यामुळे त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता सानियाने शोएबपासून खुला घेत वेगळं झाल्याचं समोर आलं आहे.
4 / 11
सानिया आणि शोएबने २०१० मध्ये निकाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. त्यांचं नातं म्हणजे भारत-पाकिस्तानचा मिलाप असंही बोललं जात होतं.
5 / 11
पण, १४ वर्षांनंतर सानिया-शोएबचा संसार मोडला. त्यांना एक मुलगा असून सध्या तो सानियाबरोबर राहत आहेत.
6 / 11
जागतिक दर्जाची टेनिसपटू असलेल्या सानियाने तिच्या खेळाने भारतीयांची मनं जिंकली. सानिया लक्झेरियस आयुष्य जगते. खेळाबरोबरच ती अनेक कंपन्यांची ब्रँड एम्बेसिडरही आहे.
7 / 11
खेळातून सानिया वर्षाला जवळपास ३ कोटींची कमाई करते. तर ब्रँडच्या जाहिरातीतून सानियाला २५ कोटी रुपयांची कमाई होते, अशी माहिती caknowledge या वेबसाइटने दिली आहे.
8 / 11
स्पोर्ट्सकीडाने दिलेल्या माहितीनुसार, सानियाचं हैदराबादमध्ये स्वत:चं घर आहे. याची किंमत जवळपास १३ कोटींच्या घरात आहे. याबरोबरच दुबईतही तिच्या नावे एक घर आहे.
9 / 11
सानियाकडे मर्सिडीज बेंझ, ऑडी, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू अशा महागड्या कारही आहेत. सानिया २५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २०० कोटींची मालकीण आहे.
10 / 11
तर सानियाचा एक्स पती शोएब मलिकही कोट्यवधींचा मालक आहे. सानियापेक्षा शोएबची संपत्ती जास्त आहे.
11 / 11
लक्झरियस आयुष्य जगणाऱ्या शोएबचं नेटवर्थ २८ मिलियन डॉलर आहे. भारतीय रुपयानुसार, शोएब एकूण २२८ कोटी संपत्तीचा मालक आहे.
टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकऑफ द फिल्डसेलिब्रिटी