Join us  

सैफने मुलासह करण जोहरची घेतली भेट, सारानंतर इब्राहिमच्या पदार्पणाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 2:40 PM

1 / 10
सैफ अली खान काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान मुलगा इब्राहिमने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
2 / 10
इब्राहिमच नाही तर त्याच्या प्रत्येक मुलाने बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवावं असे सैफने सांगितले होते.
3 / 10
जग फार बदललं आहे आणि स्वत:ला सिद्ध करणं, आपली जागा निर्माण करणं आधीपेक्षा खूप कठिण झालं आहे.
4 / 10
त्यामुळे इब्राहिमने मेहनत करावी आणि योग्य सिनेमांची निवड करावी असे सैफने त्याला सल्लाही दिला होता.
5 / 10
नुकतेच पापा सैफ अली खानसह इब्राहिम बॉलिवूडचा डॅडी करण जोहरच्या ऑफिसमध्ये भेटायला गेल्याचे फोटो समोर आले आहेत.
6 / 10
करण जोहरच्या ऑफिसमध्ये भेट झाल्याने नक्कीच इब्राहिम करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा आहेत.
7 / 10
त्यामुळे आगामी काळात सारा प्रमाणेच इब्राहिम रुपेरी पडद्यावर झळकलाच तर आश्चर्य वाटायला नको.
8 / 10
इब्राहिम अगदी हुबेहुब सैफ अली खान सारखा दिसतो. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो.
9 / 10
त्याच्या प्रत्येक अंदाजातील फोटो तो सोशल मीडियावर शेअर करतो.
10 / 10
विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच तो सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय स्टारकिड आहे.
टॅग्स :सैफ अली खान इब्राहिम अली खान