Join us  

रेखा यांच्या या फोटोंवर व्हाल फिदा, कधीही पाहिले नसतील असे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 5:10 PM

1 / 13
बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षक कोरोनाबाधित आढळल्यापासून रेखा चर्चेत आहेत.
2 / 13
रेखा यांच्या बंगल्याच्या परिसरातील अन्य चार बंगल्यांचे सुरक्षारक्षकांनाही बाधा झाली आहे. या सर्वांना मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. यानंतर बीएमसीने रेखा यांनाही कोरोना चाचणीचा सल्ला दिला. पण अद्याप तरी रेखा यांनी कोरोना चाचणी केलेली नाही.
3 / 13
त्यांनी कोरोना टेस्ट करण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच काय तर मुंबई महापालिकेतील कर्मचारी रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यासही नकार दिला. साहजिकच कोरोना टेस्ट करण्यास रेखा नकार का देत आहेत, असा प्रश्न सगळ्यांना पडला.
4 / 13
उमराव जान, इजाजत, घर आणि कलयुगसारख्या चित्रपटातील अभिनेत्री रेखा यांना भारताची ग्रेट गार्बो असं संबोधलं जातं.
5 / 13
रेखा यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरूवात १९७० साली प्रदर्शित झालेला चित्रपट सावन भादोमधून केली होती.
6 / 13
त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट दिले.
7 / 13
त्यांना त्यांच्या करियरमध्ये खूप संघर्ष करावा लागला होता.
8 / 13
हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा अभिनेत्री म्हणजे रेखा. बॉलिवूड दिवा आणि अनेकांच्या दिलों की धडकन अशी त्यांची ओळख.
9 / 13
रेखा यांच्याविषयी एक गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नसावी. ती म्हणजे,चित्रपटसृष्टीला 'मिस्टर नटवरलाल', 'उमराव जान' और 'सिलसिला' असे एक से बढकर एक सिनेमा देणा-या रेखा यांना मात्र कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते.
10 / 13
आज जेव्हा रेखा मागे वळून पाहतात तेव्हा मात्र अभिनयाला करिअर बनवल्यामुळे त्या आज खूप खूश ही आहेत. या अभिनयामुळे आणि सिनेसृष्टीमुळे रेखा यांना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे असंख्य चाहते रेखा यांना मिळाले.
11 / 13
'खून भरी मांग' हा सिनेमा करतेवेळी रेखा यांना त्यांचा अभिनेत्री बनण्याचा निर्णय योग्य वाटला. या सिनेमामुळेच आपण यापेक्षा दुसरं चांगलं काम करूच शकत नसल्याचे रेखा यांना ख-या अर्थाने पटू लागले.
12 / 13
चित्रपटसृष्टीत काम करणे हे जणू फक्त त्यांच्यासाठीच होते असे त्यांना वाटू लागले.
13 / 13
ग्लॅमरस, सुंदर हिरोईन्सच्या जगात सावळ्या रंगाच्या असून रेखा यांची जादू काही कमी झाली नाही.आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सौदर्यांवरही रसिक फिदा झाल्याचे पाहायला मिळाले.
टॅग्स :रेखा