Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाच्या या फोटोंवर रणवीर सिंगही झाला फिदा, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 16:05 IST

1 / 7
बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट हिच्या अदांवर लाखो चाहते फिदा आहेत. आता काय तर रणवीर सिंग हाही आलियाच्या मनमोहक अदांवर भाळला आहे.
2 / 7
होय, आलिया भटने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आलिया एका पुलावर निवांत उभी दिसतेय.
3 / 7
हिरवेगार डोंगर, ढग दाटून आलेलं आकाश, नजर जाईल तिथवर स्वच्छ पाणी आणि अशा एका शांत ठिकाणी आलियाचे हे फोटो क्लिक केले गेले आहेत.
4 / 7
फोटोमधील आलियाचं निखळ हास्य तर वेड लावणारं आहे. पिंक टॉप, जीन्स आणि मोकळ्या केसांत तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे.
5 / 7
आलियाच्या या फोटोंवर कोणीही फिदा होईल. अभिनेता रणवीर सिंगसुद्धा तिच्या या फोटोंवर फिदा झाला आहे. या फोटोंवर रणवीरने हार्ट इमोजी शेयर केले आहेत. आलियाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
6 / 7
आलिया भट्ट लवकरच ‘गंगुबाई काठीयावाड’ या चित्रपटात दमदार भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळींचा हा सिनेमा बनून तयार आहे. मात्र कोरोना महामारीमुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.
7 / 7
याशिवाय एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या बहुप्रतिक्षीत सिनेमात आलिया दिसणार आहे. शिवाय ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमातही ती दिसणार आहे. यात ती पहिल्यांदा तिचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत झळकणार आहे.
टॅग्स :आलिया भट