Join us

‘बर्फी’ नंतर रणबीर ‘जग्गा जासूस’ साठी दार्जिलिंग मध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 10:00 IST

रणबीर कपूर आणि त्याची जग्गा जासूस चित्रपटाची टीम दार्जिलिंग येथे काही सीन्ससाठी पोहोचली आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला,‘ जग्गा ...

रणबीर कपूर आणि त्याची जग्गा जासूस चित्रपटाची टीम दार्जिलिंग येथे काही सीन्ससाठी पोहोचली आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला,‘ जग्गा जासूस हा चित्रपट अनुराग बासू दिग्दर्शित असून चित्रपटाची थीम एकदम वेगळी आणि आकर्षक आहे.दार्जिलिंगविषयी विशेष प्रेम अनुराग दादांचे आहे. त्याला वाटते की, त्याच्या प्रत्येक चित्रपटात काही सीन्स दार्जिलिंग येथील असले पाहिजेत. मी जी भूमिका करतो आहे, ती त्याने शाळेत असताना दार्जिलिंगमध्ये केली होती. त्यामुळे येथे शूटिंग करणे खुप सोपे आणि महत्त्वाचे वाटते.दार्जिलिंग हे ठिकाण अत्यंत सुंदर आणि शांत आहे. येथील लोकही फार फ्रेंडली आहेत. मला ‘बर्फी’ नंतर दार्जिलिंग आवडू लागले. येथील लोक खुपच दयाळू आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहेत. येथील खाद्यही त्याच प्रमाणे अत्यंत चविष्ट आहे.’