Join us  

Cruise Drug Case : काहीच निष्पन्न होणार नाही याची NCB ला कल्पना; Aryan Khan ला बनवलं सुपरस्टार : राम गोपाल वर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 1:00 PM

1 / 9
आर्यन खान (Aryan Khan) ड्रग प्रकरणात (Drug Case) अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, आता चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
2 / 9
'शाहरूख खानचा मुलगा (Shah rukh Khan) आर्यन खान याच्याविरोधात काहीच समोर येणार नाही. शाहरूखच्या खऱ्या चाहत्यांनी NCB चे आभार मानले पाहिजेत,' असं राम गोपाल वर्मा म्हणाले.
3 / 9
राम गोपाल वर्मा यांनी या प्रकरणी अनेक ट्वीट्स केली आहेत. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्स प्रकरणात अडकला असून एनसीबीनं त्याच्यावर अनेक आरोप लावले आहेत.
4 / 9
आर्यनला आर्थर रोड तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक सेलिब्सही त्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. यादरम्यान, राम गोपाल वर्मा यांची ट्वीट्सही चर्चेचा विषय ठरत आहेत.
5 / 9
'शाहरूख खाननं वडील या नात्यानं आपल्या मुलाला केवळ स्टार बनवलं. परंतु एनसीबीनं त्याच्या जीवनातील तो पैलू दाखवून, जो त्याचे वडील नियंत्रित करत नाही, त्याला सुपर सेन्सिटिव्ह अभिनेता बनवलं आहे, असं राम गोपाल वर्मा म्हणाले.
6 / 9
'एनसीबीनं त्याला मूळ परिस्थिती दाखवली, ज्यामुळे च्याचा परफॉर्मन्स आणि पर्सनॅलिटी अधिक चांगली होईल,' असंही त्यांनी सांगितलं.
7 / 9
'मी आपल्या जीवनाबाबत अधिक वडील शाहरुख खानपेक्षा अधिक तुरूंगातून आणि एनसीबीकडून शिकलो असं भविष्यात आर्यन खान नक्कीच सांगेल हे मी पैज लावून सांगू शकतो,' असंही त्यांनी म्हटलं.
8 / 9
शाहरूख खानच्या खऱ्या आणि समजूतदार चाहत्यांनी एनसीबीचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी एका सुपरस्टारच्या मुलाला सुपरडुपर स्टार बनवलं, असं राम गोपाल वर्मा म्हणाले.
9 / 9
शाहरुखचा खरा फॅन म्हणून मी एसीबीचा जयजयकार असं म्हणू शकतो. आर्यन खान विरोधात काहीच समोर येणार नाही हे एनसीबी आणि सर्वांनाच माहित आहे. ही जाणूबूजून उशिर करणारी प्रक्रिया बंद झाली तर तो बाहेर येईल असंही त्यांनी नमूद केलं.
टॅग्स :राम गोपाल वर्माआर्यन खानशाहरुख खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी