Join us

Photos: राजकुमार-पत्रलेखाच्या Pre -Wedding चे फोटो व्हायरल; फराह खानसह दिग्गज सेलिब्रिटींनी फॉलो केला ड्रेस कोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 11:27 IST

1 / 8
गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
2 / 8
बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आज (१४ नोव्हेंबर) राजकुमार-पत्रलेखा मोठ्या थाटात लग्न करणार आहेत.
3 / 8
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा रंगणार असून हा लग्नसोहळा खास व्हावा यासाठी त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन केलं आहे.
4 / 8
सध्या राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो त्यांच्या Pre -Wedding चे असल्याचं पाहायला मिळत आहे.
5 / 8
प्री- वेडिंग फंक्शनसाठी राजकुमारने व्हाइट इंडो-वेस्टर्न कपडे परिधान केले होते. तर पत्रलेखानेही व्हाइट अॅण्ड सिल्व्हर कलरचा ऑफ शोल्डर हाय स्लिट गाऊन घातला होता.
6 / 8
राजकुमार आणि पत्रलेखा यांनी लग्नापूर्वीच्या काही फंक्शन्ससाठी पाहुण्यांसाठी खास ड्रेस कोड ठेवला आहे. विशेष म्हणजे या फंक्शनला आलेल्या पाहुण्यांनीही हा ड्रेस कोड फॉलो केला आहे.
7 / 8
राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका, दिग्दर्शिका फराह खानदेखील उपस्थित होती.
8 / 8
राजकुमार- पत्रलेखा चंदीगढमधील द ऑबेरॉय सुखविलास स्पा रिजॉर्टमध्ये आज लग्नगाठ बांधणार आहेत. २०१० पासून ही राजकुमार- पत्रलेखा एकमेकांना डेट करत आहेत. (photo credit: Viral Bhayani instagram page)