Join us  

ट्विटरवर शिल्पा शेट्टी व राज कुंद्रावरच्या मीम्सचा महापूर, पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 4:27 PM

1 / 10
पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक होताच सोशल मीडियावर मीम्सचा जणू महापूर आला आहे.
2 / 10
सोशल मीडियावर राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.
3 / 10
टिष्ट्वटरवर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी ट्रेंड होत आहेत. मीम्सचे तर विचारू नका.
4 / 10
पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
5 / 10
न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केलेल्या राज कुंद्रा याची आज पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
6 / 10
या खटल्यामध्ये राज कुंद्रासह ११ अजून लोकांना अटक करण्यात आली आहे. आता उद्या राज कुंद्रा याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
7 / 10
मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा हाच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले. तसेच त्याचे फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स सिल करण्यात आले आहेत.
8 / 10
राजला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता.
9 / 10
अभिनेत्री गहना वशिष्ठला पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले होते.
10 / 10
उद्योगपती राज कुंद्रा शिल्पा शेट्टीसोबत दुसरा विवाह करण्यापूर्वी एवढा चर्चेत नव्हता. मात्र शिल्पासोबतच्या विवाहानंतर तो चर्चेत राहू लागला. त्यासोबतच त्याच्याशी संबंधित वादही समोर येऊ लागले.
टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी