Join us

​ पुल्कितचे ‘twitter’ला टाटा- बाय-बाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 20:38 IST

अभिनेता पुल्कित सम्राट सध्या जाम संतापला आहे. त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित बातम्यांचे सुरू असलेले चर्वित चर्वण पुल्कितला जराही रूचलेले ...

अभिनेता पुल्कित सम्राट सध्या जाम संतापला आहे. त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित बातम्यांचे सुरू असलेले चर्वित चर्वण पुल्कितला जराही रूचलेले नाही. त्यामुळेच त्याने त्याचा राग ‘twitter’वर काढला आहे. होय, पुल्कितने त्याचे ‘twitter’ अकाऊंट बंद केले आहे. ‘ मला काहीही फरक पडत नाही. मला अजिबात फरक पडत नाही. ज्या दिवशी आपण याच्याकडे लक्ष देणे बंद करू, त्यादिवशी अधिक खंबीर बनू. असे नसेल तर  निश्चितपणे आपण कमकुवत बनू. आता आणखी tweet नाही. प्रेम आणि सहकार्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. हे आभासी जग चांगले आहे. पण इतकेही चांगले नाही,असे tweet करीत पुल्कितने twitterवरून एक्झिट घेतली.  पत्नी श्वेता रोहिरा हिच्यापासून विभक्त होणे आणि अभिनेत्री यामी गौतम हिच्यासोबतची  वाढती जवळीक यामुळे  ३२ वर्षांचा पुल्कित अलीकडे चर्चेत आहे.