Join us  

OMG! वजन वाढले की आहे गुडन्यूज? तुफान व्हायरल होत आहेत प्रियंका चोप्राचे हे ‘प्लस साईज’ फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 5:13 PM

1 / 8
होय, प्रियंकाचे हे फोटो आहेत थेट लंडनचे. पण ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत आणि सोबत प्रियंका प्रेग्नंस असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.
2 / 8
आता कारण काय तर या फोटोंमध्ये प्रियंकाचे वजन वाढलेले दिसतेय. तिचे वाढलेले वजन पाहून पीसीकडे गुडन्यूज असावी, अशी शक्यता चाहते वर्तवत आहेत.
3 / 8
या फोटोंमध्ये प्रियंका कॅज्युअल लूकमध्ये आहे. काही युजर्सच्या मते, कपड्यांमुळेच ती थोडीशी प्लस साईजची दिसतेय.
4 / 8
याआधीही अनेकदा पीसीच्या प्रेग्नंसीच्या चर्चा झाल्या आहेत. मात्र प्रत्येकवेळी त्या अफवा ठरल्या.
5 / 8
प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले होते. हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली होती.
6 / 8
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने संपवले.
7 / 8
याआधी ती ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूडपटात दिसली होती. प्रियंका पतीपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे.
8 / 8
नुकतेच प्रियंकाने लिहिलेले ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झाले. प्रियंकाचे हे आत्मचरित्र बेस्ट सेलर बुक ठरले आहे.
टॅग्स :प्रियंका चोप्रा