Join us  

पूनम ढिल्लोला आता विसरा; तिच्या लेकीच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री पडतायेत फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 4:18 PM

1 / 10
एकेकाळी आपल्या सौंदर्याने असंख्य तरुणांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूनम ढिल्लो.
2 / 10
गेल्या काही वर्षांमध्ये पूनम ढिल्लोचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तिची लोकप्रियता अद्यापही कायम आहे.
3 / 10
सोशल मीडियावर सक्रीय असलेली पूनम कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे ती बऱ्याचदा तिच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण, प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4 / 10
सध्या सोशल मीडियावर पूनमच्या लेकीचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिची लेक सौंदर्याच्या बाबातीत आपल्या आईलादेखील मागे टाकते.
5 / 10
पूनम ढिल्लोच्या लेकीचं नाव पलोमा ढिल्लो असं असून तीदेखील आईप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असते.
6 / 10
अनेकदा पलोमा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे ती सौंदर्याच्या बाबतीत लोकप्रिय स्टारकिड्सला मागे टाकताना दिसत आहे.
7 / 10
पूनम ढिल्लोने त्रिशूल (1978), काला पत्थर (1979), नूरी (1979) असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यानंतर तिने १९८८ मध्ये चित्रपट निर्माते अशोक ठकेरिया यांच्यासोबत लग्न केलं.
8 / 10
पूनम आणि अशोक यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यामुळे त्यांनी १९९८ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
9 / 10
पूनम आणि अशोक यांना अनमोल आणि पलोमा ही दोन मुलं आहेत. सध्या या मुलांचा सांभाळ पूनमच करत आहे.
10 / 10
अलिकडेच पलोमाने एक फोटोशूट केलं असून त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहिल्यावर सौंदर्यांमध्ये ती पूनम ढिल्लोलाच टक्कर देतीये असं नेटकरी म्हणत आहेत.
टॅग्स :पुनम ढिल्लोसेलिब्रिटीसिनेमा