Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raghav Chadha Salary: परिणीती चोप्राचा होणारा नवरा महिन्याला किती कमावतो? आप नेता राघव चड्ढा यांनी स्वत:च सांगितला पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 13:55 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा सध्या चर्चेत आहेत. नुकतेच या दोघांनी दिल्लीत एका इंटिमेट सेरेमनीमध्ये एंगेजमेंट केले. दोघांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आणि चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडली. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 8
एंगेजमेंटनंतर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. यासोबतच राघव आणि परिणीतींच्या कमाईचीही बरीच चर्चा आहे. परिणीतीचे इन्कम कोट्यवधी आहे, तर खासदार राघव महिन्याला किती पैसे कमावतात जाणून घेऊया. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
त्यानंतर त्यांनी सीएचे शिक्षण घेतले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून ईएमबीएसचे सर्टिफिीकेटह घेतले. त्यांनी काही काळ प्रॅक्टिसिंग-चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनही काम केले. राघव सध्या राजकारणात आहे आणि आम आदमी पक्षाचे खासदार आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
राघव यांचा मासिक पगाराचा विचार केला तर खासदाराचा मूळ पगार 30 हजार आहे. मात्र, त्यासोबत अनेक भत्तेही मिळतात. त्यानंतर हा आकडा १ लाखावर पोहोचतो. याशिवाय त्यांना अनेक सुविधाही मिळतात. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
राघव यांच्यच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्याकडे 50 लाख रुपयांपर्यंतची संपत्ती आहे. दुसरीकडे, परिणीती कमाईच्या बाबतीत राघव यांच्यापेक्षा खूप पुढे आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती एका महिन्यात 40 लाख रुपयांहून अधिक कमावते आणि एका चित्रपटासाठी 5 कोटी रुपये मानधन घेते. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
परिणीती चोप्राची एकूण संपत्ती 60 कोटी रुपये आहे. ती प्रामुख्याने चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
मुंबईत तिचे समुद्र किनारी आलिशान अपार्टमेंट आहे. यासोबतच अभिनेत्रीकडे Audi A6, Jaguar XJL आणि Audi Q5, Jaguar XJL सारख्या कार आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :परिणीती चोप्राआपसेलिब्रिटी