OMG : वयामध्ये निम्म्याचा फरक, तरीही 'या' स्टार्सनी केला रोमान्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 15:23 IST
-रवींद्र मोरे बॉलिवूडमध्ये अगोदरच्या काळात सुपरस्टार्स आपल्या वयापेक्षा २ ते ४ वर्ष लहान वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करीत होते. मात्र ...
OMG : वयामध्ये निम्म्याचा फरक, तरीही 'या' स्टार्सनी केला रोमान्स !
-रवींद्र मोरे बॉलिवूडमध्ये अगोदरच्या काळात सुपरस्टार्स आपल्या वयापेक्षा २ ते ४ वर्ष लहान वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करीत होते. मात्र आज पाहिले तर आपल्यापेक्षा निम्मे वय कमी असलेल्या अभिनेत्रींसोबत चित्रपटात काम करीत आहेत. बी-टाऊनमध्ये जणू 'एज नो बार'चा ट्रेंडच सुरु झाला की काय असे वाटू लागले आहे. चला पाहूया की, कोणत्या स्टार्सनी वयामध्ये निम्म्याचा फरक असतानाही आॅनस्क्रिन रोमान्स केला आहे. * सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हादोघांच्या वयामध्ये सुमारे २२ वषार्चा फरक आहे. तरीही ह्यदबंगह्ण चित्रपटात दोघेही रोमान्स करताना दिसले. विशेष म्हणजे हा चित्रपट २०११ चा सुपर हिट ठरला. या चित्रपटामुळे सोनाक्षी सिन्हा एका रात्रीत हिट झाली आणि आतापर्यंत तिने कित्येक सीनियर स्टार्ससोबत काही चित्रपटदेखील साइन केले आहेत. * दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान४१ वर्षीय सैफ अली खान आणि २६ वर्षीय दीपिका पादुकोण प्रकाश झाचा चित्रपट 'आरक्षण'मध्ये दोघेही रोमान्स करताना दिसले. शिवाय 'रेस-२'मध्येदेखील दोघेजण सोबत रोमान्स करताना आढळले. * शाहरूख खान आणि कॅटरिना कैफ ४६ वर्षीय शाहरुख खान आणि २६ वर्षीय कॅटरिना कैफ या दोघांच्या वयात १९ वषार्चा फरक आहे. तरीही काही दिवसांपूर्वी ही जोडी चर्चेत राहिली. ‘बॉम्बे टॉकिज’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटात दोघांची जोडी चर्चेचा विषय ठरला होता. अजूनही दर्शक शाहरुख खानला सलमानची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिनासोबत सिल्वर स्क्रीनवर रोमान्स करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. * अक्षय कुमार आणि असिन या दोघांच्या वयातही खूप मोठा फरक आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय आणि असिन यांच्या वयात सुमारे १८ वषार्चे अंतर आहे. यांनीही ह्यखिलाडी ७८६ह्ण आणि ह्यहाऊसफुल२ह्ण मध्ये रोमान्स केला आहे. Also Read : हृतिक रोशनबरोबर कोण करणार रोमांस; कॅटरिना कैफ की दीपिका पादुकोण?