Join us

OMG : ​ऐश्वर्या रॉयपासून आलिया भटपर्यंत "या" तरुणांवर होते पहिले प्रेम, मात्र पैसा-प्रसिद्धी मिळताच विसरल्या त्यांना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 13:27 IST

असे म्हणतात की, पहिले प्रेम कधी विसरले जात नाही. मात्र सध्याची बदलती जीवनशैली आणि पाश्चात्य संस्कृतिचे अनुकरण या गोष्टींचा ...

असे म्हणतात की, पहिले प्रेम कधी विसरले जात नाही. मात्र सध्याची बदलती जीवनशैली आणि पाश्चात्य संस्कृतिचे अनुकरण या गोष्टींचा विचार केला तर अगदी रक्ताची नातीदेखील विसरली जातात, तर तिथे प्रेम कुठे टिकेल. त्यातच हा विषय जर सिनेसृष्टीशी संबंधीत असेल तर याची शाश्वती कुणीच देऊ शकणार नाही. बऱ्याच अशा बॉलिवूड अभिनेत्र्या आहेत की ज्या पैसा-प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपले पहिले प्रेम विसरल्या. सध्याच्या लाइफपेक्षा त्यांचे अगोदरचे लाइफ बरेच वेगळे होते. शिवाय त्यांच्या आयुष्यात त्यांचे प्रेमही वेगळेच होते. आज आपण जाणून घेऊया की, दीपिका पादुकोण पासून आलिया भटपर्यंत यांच्या आयुष्यात पहिले प्रेम कोण होते.  * दीपिका पादुकोण आणि निहार पंड्यादीपिका अगोदर मॉडेलिंग क्षेत्रात काम करायची. तिने बऱ्याच जाहिरातीतदेखील काम केले आहे. याच दरम्यान दीपिका किंगफिशर कॅलेंडर गर्लसुध्दा बनली होती. येथून दीपिकाच्या लोकप्रियतेत भर पडली. विशेष म्हणजे दीपिका चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअर्समुळेच जास्त चर्चेत राहिली. असे म्हटले जाते की तिच्या आयुष्यात बरेच तरुण आले आणि गेलेही. आपणास असे वाटते की, रणबीर कपूर हा दीपिकाच्या आयुष्यात येणारा पहिला व्यक्ती असेल, मात्र तसे नसुन निहार पंड्या हा दीपिकाच्या आयुष्यात येणारा पहिला तरुण होते. विशेष म्हणजे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्येदेखील होते. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर निहारचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानसोबत जुळले होते. * ऐश्वर्या राय बच्चन आणि राजीव मुलचंदानी विश्वसुंदरीचा किताब पटकावणारी ऐश्वर्या रॉय बच्चनचे करोडो चाहते आहेत. ऐश्वर्याचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आणि तिचे नाव सलमान खानशी जोडले गेले होते. दोघांचेही प्रेमप्रक रण बरेच चर्चिले गेले, मात्र दोघांचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर ऐश्वर्याचे नाव विवेक ओबेरॉयसोबत जोडले गेले. त्यानंतर मात्र ऐश्वर्याचे अभिषेक बच्चनसोबत लग्न झाले. बऱ्याचजणांना असे वाटते की,  सलमान खान ऐश्वर्याच्या आयुष्यात येणारा पहिला व्यक्ती आहे. मात्र तसे नाहीये. मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या राजीव मूलचंदानी याच्यासोबत ऐश्वर्याचे पहिले अफेअर होते. परंतु, ऐश्वर्या यशाच्या शिखरावर गेल्यावर दोघांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन दुरावा निर्माण झाला होता. * प्रियांका चोप्रा आणि असीम मर्चंट मिस वर्ल्डचा किताब मिळण्यापुर्वीच असीम मर्चंट नावाचा तरुण प्रियांकाच्या आयुष्यात होता. मात्र मिस वर्ल्ड ठरुन नावलौलिक मिळाल्यानंतर प्रियांकाने असीमकडे पाठ फिरवली, असे म्हटले जाते.* जॅकलिन फर्नांडिस आणि हसन बिन रशीद अल खलिफाजॅकलिन फर्नांडिस आणि बहरीनचा राजकुमार हसन बिन रशीद अल खलिफा हे दोघेही अगोदर तब्बल दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच हसनसोबत जॅकलिनचे ब्रेकअप झाले.* अनुष्का शर्मा आणि जोहेब युसुफसध्या अनुष्का आणि विराट कोहली यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगत आहे. मात्र विराट अनुष्काचे पहिले प्रेम नाहीये. जोहेब युसुफ हा अनुष्काचे पहिले प्रेम आहे. जोहेब यानेच अनुष्काला चित्रपटसृष्टीत आणले, असे सांगितले जाते. मात्र, अनुष्का आता त्याला विसरली आहे. * श्रद्धा कपूर आणि वनराज जावेरी 'आशिकी-2'ची आरोही म्हणजेच श्रद्धा कपूर आणि तिचा को-स्टार आदित्य रॉय यांच्या प्रेमप्रकरणाचे बरेच किस्से रंगले. परंतु, श्रद्धा कपूरचे पहिले प्रेम वनराज जावरी आहे. त्यासोबत श्रद्धा तब्बल पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये होती. मात्र आता श्रध्दा त्याच्यासोबत चुकूनही दिसत नाही. * सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य श्रॉफ'दबंग गर्ल' अशी ओळख असलेली सोनाक्षी सिन्हा प्रचंड लोकप्रिय झाली. परंतु, सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी आदित्य श्रॉफ नावाचा तरुण तिच्या आयुष्यात होता. तेव्हा आदित्य, फेम मल्टिप्लेक्समध्ये अ‍ॅडव्हर्टाइजिंग डिव्हिजनमध्ये प्रोग्रामिंग हेड म्हणून काम करायचा. याच काळात दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले आणि त्यांचे नाते संपुष्टात आले. सोनाक्षी प्रसिध्दीझोतात आली आणि त्याला विसरली. * आलिया भट आणि अली दडारकरएकाच शाळेत शिकणाऱ्या अली दडारकर सोबत आलिया बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी डेट करत होती. सध्या इंग्लंडमध्ये असून तेथे उच्च शिक्षण घेत आहे. तर आलियासुद्धा बी टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांनी आपले वेगवेगळे मार्ग निवडले. सध्या आलिया अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे समजते. source : http://divyamarathi.bhaskar.com