Join us  

IN PICS : “पिक्चर चले ना चले, नवाजुद्दीन सिद्दीकी तो चलेगा... ”, नवाज असं का म्हणाला...?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 11:16 AM

1 / 9
आज बॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकारांची यादी करायची म्हटलं तर नवाजुद्दीन सिद्दीकी हे नाव त्यात ठळकपणे नमूद करावं लागेल. खरं तर नवाजकडे ना चेहरा होता, ना फिजिक्स. पण फक्त आणि फक्त दमदार अभिनयाच्या जोरावर नवाजने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.
2 / 9
अलीकडच्या काळात नवाजचे अनेक सिनेमे आले आणि आले तसे आपटलेत. फोटोग्राफ, मोतीचूर चकनाचूर, हिरोपंती 2 असे त्याचे अनेक सिनेमे फ्लॉप झालेत. पण नवाजला यामुळे फरक पडत नाही.
3 / 9
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत नवाज यावरचं बोलला. सिनेमा फ्लॉप झाला की त्याचा संपूर्ण दोष कलाकाराला दिला जातो. दिग्दर्शकाला मात्र कोणीही एक साधा प्रश्नही विचारत नाही, असं नवाज म्हणाला.
4 / 9
मला सिनेमे फ्लॉप झाल्याने काहीही फरक पडत नाही. पिक्चर चले ना चले, लेकिन नवाजुद्दीन सिद्दीकी तो चलेगा... मी कधीही हार मानली नाही, मानणार नाही. मी प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि त्या एकाच गोष्टीवर माझा विश्वास आहे, असं तो म्हणाला.
5 / 9
एक सिनेमा फ्लॉप झाला असेल तर त्यामागे अनेक कारणं असतात. कदाचित दिग्दर्शन चांगलं नसेल. पण एखादा सिनेमा आपटला की दिग्दर्शकाला कोणीही प्रश्न विचारत नाही. सगळा दोष कलाकारांना देऊन सगळे मोकळे होतात, हे चुकीचं आहे, याकडे त्याने लक्ष वेधलं.
6 / 9
त्याने शाहरूखचंही उदाहरण दिलं. तो म्हणाला, शाहरूखचा एखादा सिनेमा चालला नाही तर त्याचा एकट्याचा दोष कसा? इतकी असंख्य फॅन्स फॉलोइंग असलेला शाहरूख तर डायरेक्टरच्या इशाºयावर काम करतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे. दोष एक तर डायरेक्टरचा आहे किंवा मग चित्रपटाच्या खराब कथेचा.
7 / 9
खराब दिग्दर्शक, खराब कथेबद्दल कोणीही बोलत नाही. सगळे कलाकारांच्या डोक्यावर खापर फोडतात. त्यामुळे मला फरक पडत नाही. फ्लॉपची मी चिंता करत नाही, असं नवाज म्हणाला.
8 / 9
नवाजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ‘हड्डी’ या सिनेमात तो दिसणार आहे.
9 / 9
याशिवाय टीकू वेड्स शेरू, जोगीरा सारा रा रा आणि नूरानी चेहरे या चित्रपटात नवाजुद्दीन दिसणार आहे.
टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूड