Join us  

Nana Patekar Son : नाना पाटेकर यांचा लेक मल्हारला पाहिलंत का?, दिसतो वडिलांसारखा हुबेहूब आणि आहे खूप टॅलेटेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 6:00 AM

1 / 9
नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या वेगवेगळ्या भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 9
नाना पाटेकर ज्या प्रकारे स्वतःला लाइमलाइटपासून दूर ठेवतात. त्यांचं कुटुंबही तसंच आहे. दिग्गज अभिनेत्याचे कुटुंबही स्वतःला लाइमलाइटपासून दूर ठेवते. त्यातलाच एक नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार पाटेकर.
3 / 9
मल्हार त्याच्या वडिलांप्रमाणे मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवतो, तुम्ही नाना पाटेकर यांचा मुलाला पाहिले नसेल, तर आम्ही तुम्हाला त्याची ओळख करून देतो.
4 / 9
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार हुबेहूब नानासारखा दिसतो. नानांसारखा साधेपणा त्याला खूप आवडतो.
5 / 9
मल्हारने मुंबईतील सरस्वती मंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे.
6 / 9
मल्हारला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची आवड होती आणि तो प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करणार होता, पण नंतर नाना आणि प्रकाश झा यांच्यात भांडण झाले आणि नानांनी मल्हारला प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
7 / 9
नंतर, मल्हारने राम गोपाल वर्मा यांच्या द अटॅक ऑफ 26/11 या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. आता त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, जे त्याने वडील नाना पाटेकर यांच्या नावाने सुरू केले आहे. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस आहे.
8 / 9
नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांनी एकमेकांना घटस्फोट दिलेला नाही, परंतु दोघेही खूप दिवसांपासून वेगळे राहत आहेत.
9 / 9
मल्हार त्याच्या आईच्या जास्त जवळचा. मल्हारला एक मोठा भाऊही होता, तो काही काळानंतर मरण पावला. आपल्या मुलाच्या मृत्यूने नानांना खूप धक्का बसला आणि ते बराच काळ अस्वस्थ राहिले. मात्र, मल्हारच्या जन्मानंतर नानांना त्याचा आनंद परत मिळाला.
टॅग्स :नाना पाटेकर