Join us  

IN PICS : दिलीप कुमार यांच्या 10 अजरामर भूमिका; या सिनेमांनी बनवले सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 1:40 PM

1 / 10
दाग (1952)- दाग या सिनेमासाठी दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळवणारे दिलीप कुमार पहिले कलाकार होते. दिलीप कुमार, निम्मी, ललिता पवार यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा दिलीप कुमार यांचा एक क्लासिक सिनेमा मानला जातो.
2 / 10
नया दौर (1957) - दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या मुख्य भूमिका आणि बी. आर. चोप्रा यांचे दिग्दर्शन हा सिनेमाही क्लासिक ठरला. या सिनेमातील दिलीप कुमार यांचा जबरदस्त अभिनय यादगार ठरला तो कायमचाच.
3 / 10
मधुमती (1958) - विमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील पहिला पॅरानॉर्मल रोमान्स चित्रपट होता. सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाने कमाल केली. दिलीप कुमार यांनी या सिनेमात केलेल्या अभिनयाला तोड नाही..
4 / 10
देवदास (1955)- शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित या सिनेमातील दिलीप कुमार यांनी साकारलेली भूमिका त्यांच्या अजरामर भूमिकांपैकी एक आहे. असा ‘देवदास’ पुन्हा होणे नाही...
5 / 10
मुगल-ए-आझम(1960)- 14 वर्षांचे अथक परिश्रम, मधुबालाचे अप्रतिम सौंदर्य आणि दिलीप कुमार यांची जबरदस्त अदाकारीने सजलेला ‘मुगल-ए-आझम’ हा सिनेमा विसरता येणे शक्यच नाही. त्याकाळातील हा सर्वात महागडा सिनेमा होता. सिनेमा खूप गाजला आणि सलीम आणि अनारकलीची कहाणी जणू अमर झाली.
6 / 10
गंगा जमुना (1961)- फार कमी लोकांना ठाऊक असेल की, गंगा जमुना हा दिलीप कुमार यांनी प्रोड्यूस केलेला एकमेव सिनेमा आहे. या सिनेमात दिलीप कुमार यांनी रंगवलेला एक अल्लड गावकरी अफलातून आहे. या सिनेमासाठी दिलीप कुमार खास भोजपुरी भाषा शिकले होते.
7 / 10
राम और श्याम (1967) - दिलीप कुमार, वहिदा रहमान, मुमताज यांच्या अभिनयाने सजलेला राम और श्याम हा एक क्लासिक सिनेमा. यात दिलीप कुमार यांनी डबलरोल साकारला होता. दोन्हीपरस्पर स्वभावाची पात्र रंगवताना दिलीप कुमार यांना पडद्यावर पाहणे एक पर्वणी होती आणि आहे.
8 / 10
शक्ती (1982) - दिलीप कुमार व अमिताभ या जोडीचा हा पहिला व एकमेव सिनेमा. रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातील पिता व पुत्राची कथा पडद्यावर दिसली होती. पित्याची भूमिका दिलीप कुमार यांनी अजरामर केली होती.
9 / 10
कर्मा (1982) - दिलीप कुमार व सुभाष घर्इंचा देशभक्तीने ओतप्रोत भरलेला हा एक सिनेमा. दिलीप कुमार यांनी हा सिनेमा जणू अजरामर केला.
10 / 10
सौदागर (1991) - दिलीप कुमार व राज कुमार यांनी ‘पैगाम’ या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. पुढे दोघांमध्ये मतभेद वाढले आणि दोघांनीही एकमेकांसोबत काम न करण्याची शपथ घेतली. पण 32 वर्षांनंतर ‘सौदागर’च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा दिसली आणि या जोडीने पुन्हा कमाल केली.
टॅग्स :दिलीप कुमारबॉलिवूड