Join us  

ufff...!! मौनी रॉयचं पुन्हा एक बोल्ड फोटोशूट, पिंक ब्रालेटमध्ये दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 5:38 PM

1 / 8
टीव्ही इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी मौनी राॅय सतत या ना त्या कारणानं चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती प्रचंड ॲक्टिव्ह आहे.
2 / 8
सध्या मौनीच्या नव्या फोटोंची चर्चा आहे. मौनीने नवे फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंनी तिच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.
3 / 8
पिंक कलरच्या ब्रालेट, त्यावर श्रग आणि बिकिनीमध्ये मौनीनं एकापेक्षा एक बोल्ड पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे.
4 / 8
काही चाहत्यांना मौनीचे हे फोटो भलतेच आवडले आहेत. काहींनी मात्र यावरून तिला ट्रोलही केलं आहे. अंग दाखवून प्रसिद्ध कशाला हवीये, हेच मला कळत नाही, असं एका चाहत्याने लिहिलं आहे.
5 / 8
मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 2007 मध्ये, तिने एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती.
6 / 8
श्श्..फिर कोई है, देवों के देव महादेव सारख्या शोने मौनीच्या लोकप्रियतेत भर घातली. नागिन 1, नागिन 2, नागिन 3 च्या यशानंतर मौनी रॉय सर्वात महागड्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक बनली. मौनी ‘झलक दिखला जा 7’ या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.
7 / 8
मौनी रॉय टीव्ही शो, चित्रपट, जाहिरात, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियातून कोट्यवधींची कमाई करते. इतकंच नव्हे तर अभिनेत्री म्युझिक व्हिडिओंमधूनही भरपूर कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनीची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये इतकी आहे.
8 / 8
गेल्या वर्षी जानेवारीत मौनीने बिझनेसमॅन सूरज नाम्बियारसोबत लग्नगाठ बांधली. गोव्यात मौनी व सूरजचं धुमधडाक्यात लग्न झालं होतं.
टॅग्स :मौनी राॅय