ही आहे साउथची मलाइका अरोरा; बोल्डनेसमध्ये खऱ्या मलाइकालाही देते मात!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 22:42 IST
तेलगू आयटम डान्सर आणि अभिनेत्री हिना पांचाल हिला साउथची मलाइका अरोरा म्हणून ओळखले जाते. कारण तिचा चेहरा मलाइकाशी बºयापैकी ...
ही आहे साउथची मलाइका अरोरा; बोल्डनेसमध्ये खऱ्या मलाइकालाही देते मात!!
तेलगू आयटम डान्सर आणि अभिनेत्री हिना पांचाल हिला साउथची मलाइका अरोरा म्हणून ओळखले जाते. कारण तिचा चेहरा मलाइकाशी बºयापैकी मिळता जुळता असून, बोल्डनेसच्या बाबतीतही ती खºया मलाइका अरोराला मात देते. हिनाने काही दिवसांपूर्वीच एक टॉपलेस फोटोशूट केले होते. ज्यामुळे ती सध्या प्रचंड चर्चेत आहे. मलाइकाशी चेहरा, बॉडी आणि स्टाइल मिळतीजुळती असल्यावरून हिना सांगते की, ‘मी खरच खूप लकी आहे. कारण मला चक्क मलाइका अरोराशी कम्पेयर केले जाते.’ २०१५च्या फोर्ब्स इंडियाच्या टॉप १०० सेलिब्रिटींमध्ये हिनाला स्थान देण्यात आले होते. हिनाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग केले आहेत. ‘मोहल्ले में हुक्का’, ‘बेवड़ा-बेवड़ा’, ‘बेबो-बेबो’, ‘राजू ओ राजू’, ‘टकमक-टकमक’ आणि ‘बलम बंबई’ तिचे हे प्रचंड हिट झालेले आयटम सॉन्ग आहेत. हिनाविषयी कोरिओग्राफर सरोज खानने म्हटले होते की, ‘मी बॉलिवूडला एक नवी डान्सिंग दीवा आणि स्किल्ड डान्सर देत आहे. दरम्यान, हिनाने तेलगू चित्रपटांव्यतिरिक्त तामिळ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने ‘हम है तीन खुराफाती, लाइफ में ट्विस्ट हैं, जस्ट गम्मट, मिस टनकपूर हाजिर हों, लोड्डे, रत्न मंजरी, यगाविरयनुम ना काक्का, बाबूजी एक टिकट बम्बई’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर तिने काही रिअॅलिटी शोमध्येदेखील आपला जलवा दाखविला आहे. रिअॅलिटी शोच्या एका व्यासपीठावर तिने खºयाखुºया मलाइका अरोराची भेट घेतली होती. मलाइकादेखील तिला बघून आश्चर्यचकीत झाली होती. या साउथच्या मलाइका अरोराचे काही फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार असून, तुम्ही यावर तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा...