Join us

‘बेगमजान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST

‘कहानी २’ नंतर अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘बेगमजान’ हा चित्रपट येतोय. चित्रपटासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली असून साहजिकच तिच्या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी चित्रपटाच्या टीमसह काही कलाकारांनी तिथे उपस्थिती नोंदवली.

‘कहानी २’ नंतर अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘बेगमजान’ हा चित्रपट येतोय. चित्रपटासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली असून साहजिकच तिच्या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी चित्रपटाच्या टीमसह काही कलाकारांनी तिथे उपस्थिती नोंदवली.ट्रेलर लाँच सोहळ्याप्रसंगी विद्या बालनने फोटोग्राफर्सना अशी दिलखेचक पोझ दिली.वेगळा विषय आणि नवे स्टारकास्ट घेऊन येणारा हा चित्रपट एका वेगळया विषयावर आधारित आहे. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम याठिकाणी हजर होती.विद्या बालन एवढी सुंदर दिसत होती की, चित्रपटाच्या टीममधील एका अभिनेत्रीला तिच्यासोबत काम करण्याचा मोह आवरता आला नाही.बंगाली बाला विद्या बालन ही काळ्या रंगाच्या एका अतिशय सुंदर ड्रेसमध्ये येथे आली होती. त्यावर साजेशी ज्वेलरी देखील तिने घातली होती. तिच्यावर फारच खुलून दिसत होता हा ड्रेस. पाहा तर....बेगमजानचे पोस्टर पाहिलेय ना तुम्ही? त्यावर ज्या पोझमध्ये विद्या बसलेली दिसते. अगदी तशीच पोझ देण्याचा आग्रह तिला फोटोग्राफर्सनी केला. तेव्हा ती त्यांना नाही म्हणू शकली नाही. तिने अशी हॉट अंदाजात याठिकाणी पोझ दिली.अनुभवी अभिनेत्रींचे फॅन्स खुप जण असतात. विद्याचेही तसेच झाले. चित्रपटात घेण्यात आलेले नवे स्टारकास्ट यांना तिच्यासोबत काम करण्याचा तगडा अनुभव तर मिळाला आहेच. पण, याप्रसंगी तिच्या हाताला किस करायलाही त्या विसरल्या नाहीत.या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला अभिनेता चंकी पांडे हा देखील आला होता.हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्री गौहर खान हिने अशा डॅशिंग अंदाजात या सोहळयात सहभागी झाली होती.सेल्फीच्या मोहापासून फिल्मीजगतही दुर नाही. त्याचा हा पुरावा.