Join us  

'कुछ कुछ होता है' सिनेमाची 'अंजली' आता दिसते इतकी ग्लॅमरस,सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

By सुवर्णा जैन | Published: September 22, 2020 3:42 PM

1 / 11
ही भूमिका जास्त मोठी नसली तरी छोट्या अंजलीला आजही रसिक विसरलेले नाहीत. तिचे आत्ताचे ग्लॅमरस फोटो पाहून तिच छोटी अंजली आजही आठवते.
2 / 11
'कुछ कुछ होता है' नंतर सना 'हर दिल जो प्यार करेगा' आणि 'बादल' सिनेमातही बालकलाकार म्हणून झळकली होती.
3 / 11
या सिनेमानंतर सना अचानक गायब झाली.
4 / 11
काही वर्षा पर्यंत तिने कोणत्याच सिनेमात भूमिका साकारली नव्हती. दरम्यानच्या काळात शिक्षणावरच तिने तिचे लक्ष केंद्रित केले होते.
5 / 11
काही वर्ष अभिनयातून ब्रेक घेतलेल्या सनाने 2008 मध्ये 'बाबुल का आंगन छूटे न' आणि 'लो हो गई पूजा इस घर की' टीवी मालिकेतून कमबॅक केले.
6 / 11
टीव्ही मालिकेतील तिच्या भूमिकेलाही रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती.
7 / 11
त्यानंतर रियलिटी शो 'झलक दिखला जा 6', 'झलक दिखला जा 7', 'नच बलिए 7' आणि 'झलक दिखना जा 9' मध्ये सहभागी होत तिने आपल्या डान्सिंग स्टाईलनेही रसिकांची पसंती मिळवली.
8 / 11
छोटा पडदा गाजवल्यानंतर पुन्हा एकदा सनाने २०१२ मध्ये रूपेरी पडद्यावर जोरदार एंट्री केली. करण जोहरचा सिनेमा 'स्टुंडेंटऑफ द इअर' मध्ये ती झळकली.
9 / 11
सिनेमात वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका होत्या. मात्र या सगळ्यांमध्ये सना तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत राहिली.
10 / 11
यानंतर तिच्या वाट्याला फारशा चांगल्या भूमिका आल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा सना बॉलिवूडपासून काहीशी दूर गेली.
11 / 11
सध्या ती केवळ सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. नवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते.
टॅग्स :शाहरुख खानसना सईद