Join us  

SEE PICS : फाटकी जीन्स, त्यातच गेला तोल...! फॅशनच्या नादात क्रिती सॅनन झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 11:45 AM

1 / 9
क्रिती सॅनन सध्या फॅशनच्या बाबतीत तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडताना दिसतेय. अलीकडे याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले. क्रितीने बोल्ड बनण्याच्या नादात असा काही अवतार केला की, पाहून काही लोकांच्या भुवया उंचावल्या. त्यात हाय हिल्समुळे बयेचा तोल गेला आणि त्यावरूनही तिचे हसे झाले.
2 / 9
क्रिती एका सलून बाहेर दिसली. यावेळी तिने ब्लॅक कलरचा टॉप घातला होता. डीप यू कटच्या या बॅकलेस टॉपसोबत क्रितीने कॅरी केली ती ब्ल्यू कलरचा डिस्ट्रेस्ड हाय राइज बॉटम्स जीन्स. पण तिची ही जीन्स पाहूनच लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
3 / 9
खरे तर या आऊटफिटमध्ये क्रिती स्टाईलिश दिसत होती, पण काही लोकांनी तिच्या त्या फाटक्या जीन्समुळे तिला ट्रोल करणे सुरु केले.
4 / 9
त्यातच, हाय हिल्समुळेही क्रिती ट्रोल झाली. हाय हिल्स घालून चालत असताना ती पडता पडता वाचली.
5 / 9
यावरूनही लोकांनी तिला ट्रोल केले. क्रितीचा तोल गेल्याचे पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले.
6 / 9
उंची चांगली असताना हाय हिल्सची गरज काय, असे एकाने तिला सुनावले.
7 / 9
नगरपालिकेला बोलवा, म्हणत एका युजरने तिची खिल्ली उडवली.
8 / 9
क्रितीने टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती’ या सिनेमातून डेब्यू केला होता. यानंतर तिने अनेक सिनेमात काम केले.
9 / 9
तिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर लवकरच ती मिमी, बच्चन पांडे, भेडिया और टायगर या सिनेमात दिसणार आहे. टायगर श्रॉफसोबत ‘गणपत’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.
टॅग्स :क्रिती सनॉन