Join us  

‘कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टीनं घेतली अभिनेता रजनीकांत यांची भेट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 6:23 PM

1 / 7
‘कांतारा’ (Kantara) या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. 15 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं वर्ल्डवाईड 250 कोटींवर कमाई केली, यातच सगळं आलं.
2 / 7
या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) हे नाव चर्चेत आहे. ऋषभ शेट्टी यानेच ‘कांतारा’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे
3 / 7
साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार रजनीकांत यांनीही 'कांतारा' पाहिल्यानंतर ऋषभ शेट्टीचे कौतुक केले. (फोटो: ट्विटर)
4 / 7
ऋषभ शेट्टीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर राजकांत यांच्या सोबतच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: ट्विटर)
5 / 7
या फोटोंमध्ये ऋषभ रजनीकांत यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. (फोटो: ट्विटर)
6 / 7
हे फोटो शेअर करत ऋषभने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्ही एकदा आमची प्रशंसा केली. आम्ही शंभर वेळा तुमची स्तुती करू. धन्यवाद @rajinikanth सर, आमच्या कांतारा चित्रपटाचे कौतुक केल्याबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.' (फोटो: ट्विटर)
7 / 7
ऋषभ शेट्टीचा कांतारा हा सिनेमा मूळ कन्नड भाषेत बनला. 30 सप्टेंबरला कन्नड भाषेत तो रिलीज झाला. पण चित्रपटाला मिळालेला उदंड प्रतिसाद बघता, हा सिनेमा हिंदीत डब करण्यात आला. चित्रपटाचं हिंदी डब व्हर्जन गेल्या 14 ऑक्टोबरला रिलीज झालं.
टॅग्स :रजनीकांतTollywoodसेलिब्रिटी