Join us  

'कल हो ना हो'चा बालकलाकार आठवतोय का?, आता त्याला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 1:45 PM

1 / 8
चित्रपटातून कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारे अनेक बालकलाकार आता मोठे झाले आहेत. यातीलच एक बालकलाकार आहे कल हो ना होमध्ये प्रीती झिंटाच्या लहान भावाची भूमिका साकारणारा शिव. आता शिव बराच मोठा झाला आहे.
2 / 8
कल हो ना होमध्ये निरागस शिवची भूमिका साकारत अथित नाईकने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यानंतर वयाच्या ११ व्या वर्षीपासून त्याने अभिनय करणं सोडून दिलं.
3 / 8
छोटा शिव आता ३२ वर्षांचा झाला आहे. त्याच्या लेटेस्ट फोटोंमध्ये त्याला ओळखणं ही कठीण जातयं. मात्र आता तो अभिनेता म्हणून काम करत नाही. अथित नाईक बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने कल हो ना हो शिवाय आबरा का डाबरा, मुझसे दोस्ती करोगे आणि जानर्शी सारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. शहीद सिनेमा त्याने लहानपणीच्या भगत सिंग यांची भूमिका साकारली होती.
4 / 8
अथित आता अभिनय करत नसला तरीही तो सिनेसृष्टीत सक्रिय आहे. अभिनय न करता तो दिग्दर्शन आणि छायांकन रमला आहे. काही शॉर्ट फिल्म्स त्याने दिग्दर्शित केल्या आहे. ज्या कान्स फिल्म (Cannes) फेस्टिव्हलमध्ये गेल्या होत्या.
5 / 8
अथितने 2014 साली कोलंबिया विद्यापीठातून पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्याने फोटोग्राफी, सिनेमाटोग्राफी या विषयांत रुची निर्माण झाली.
6 / 8
अथितने डॉक्टर अक्षदा कदम नाईक हिच्याशी विवाह केला आहे. सोशल मीडियावर तो फार सक्रिय असतो.
7 / 8
अमेरिकेत असताना अथित नाईकने एक टीव्ही शो आणि काही जाहिराती शूट केल्या. त्यानंतर अथिक भारतात परतला आहे.
8 / 8
भारतात परतल्यावर अथित नाईकने काही ओटीटीवरील शोजमध्ये काम केलं आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीप्रीती झिंटा