Join us  

जान्हवीच्या धडक सिनेमाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर खिल्ली, सैराटच्या तुलनेत धडक टुकार असल्याचे मिम्स आणि विनोद जबरदस्त ट्रेंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 4:56 AM

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे 'सैराट'.'झिंग झिंग झिंगाट'च्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्ष: याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी ...

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे 'सैराट'.'झिंग झिंग झिंगाट'च्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्ष: याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या.त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले.या सिनेमानं बॉलिवूडवरही मोहिनी घातली.सैराटची रुपेरी पडद्यावरील जादू पाहून बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा हिंदीत रिमेक बनवला.दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर आणि अभिनेता इशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असलेल्या धडक सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. धडकच्या ट्रेलरला रसिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. बॉलिवूडमध्ये अनेकांना धडक सिनेमाचा ट्रेलर भावतो आहे. जान्हवीच्या फॅन्सकडूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर धडक सिनेमाची आणि ट्रेलरची खिल्ली उडवण्यात येत आहे. 'धडक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच त्याची तुलना सैराटशी होत आहे. धडकचा ट्रेलर आणि सैराट यांत काय साम्य आहे याचीही जोरदार चर्चा रंगते आहे. सोशल मीडियावर तर धडकच्या ट्रेलरचे खिल्ली उडवणारे मिम्स आणि विनोदांचा भडिमार सुरु आहे. सोशल मीडियावर हे मिम्स आणि विनोद ट्रेंडिंग आहेत.'धडक' सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सैराटमधील कलाकारांचं खरंच अप्रूप वाटलं. सैराटच्या कलाकारांबद्दल आदर आणि मान सन्मान द्विगुणित झाला आहे अशी पोस्ट एका युझरने सोशल मीडियावर शेअर केली होती. बॉलिवूडच्या स्टारकिड्सना सैराटच्या कलाकारांकडून बरंच शिकावं लागेल असंही या युझरने म्हटले आहे. धडकचा ट्रेलर आणि सैराटची तुलना करण्यासाठी नेटिझन्सनी अनेक फोटो, विनोद सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या मिम्स आणि विनोदांमध्ये धडक सैराटच्या तुलनेत टुकार असल्याचं मत नेटिझन्सनी व्यक्त केले आहे. कुणी विराट कोहली आणि त्याचा डुप्लिकेट, तर कुणी सैफ अली खान आणि त्याचा डुप्लिकेट यांचे फोटो शेअर करत विनोदी मिम्स बनवले आहेत. कुणी अंबानींचा महल अँटिलिया म्हणजे सैराट आणि त्यासारखीच दुसरी इमारत उभारण्याचा प्रयत्न म्हणजेच धडक अशाप्रकारचे मिम सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. पाहूया सोशल मीडियावरील हेच धम्माल मिम्स आणि विनोद….