Join us  

पाहा जान्हवी कपूरचे कुटुंबियांसोबतचे फोटो, लहानपणी देखील दिसायची तितकीच क्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 6:37 PM

1 / 8
जान्हवी कपूरच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे तिच्या कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
2 / 8
जान्हवी नेहमीच तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.
3 / 8
जान्हवीचा आज वाढदिवस असून ती अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. तिने आईच्या पावलावर पाऊल ठेवत धडक या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
4 / 8
श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर जान्हवी आणि खुशी या दोन्ही मुलींची काळजी खूपच चांगल्याप्रकारे घेतात.
5 / 8
खुशी ही जान्हवीची लहान बहीण असून ती अनेक सार्वजनिक कार्यक्रमात बहिणीसोबत हजेरी लावते.
6 / 8
श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर आणि बहीण अंशुला कपूर यांनी जान्हवी आणि खुशीला आधार दिला.
7 / 8
बोनी कपूर यांचे आपल्या मुलांसोबतचे नाते एखाद्या मित्राप्रमाणे आहे. जान्हवीसोबत ते नेहमीच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावतात.
8 / 8
जान्हवी प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि संजय कपूरची पुतणी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा हा फोटो कपूर कुटुंबियांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केला होता.
टॅग्स :जान्हवी कपूरश्रीदेवीबोनी कपूर