Join us  

आतून इतके सुंदर आहे ‘मस्त मस्त’ गर्ल रवीना टंडनचे घर, पाहा Inside फोटो

By रूपाली मुधोळकर | Published: October 30, 2020 2:35 PM

1 / 12
‘मस्त मस्त’ गर्ल रवीना टंडनने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. आजही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. याच रवीनाचे घर इतके अलिशान आहे की, फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
2 / 12
रवीना मुंबईतील वांद्रस येथे वास्तव्याला आहे. येथे तिचा आणि तिचे पती अनिल थडानी यांचा अतिशय सुंदर बंगला आहे.
3 / 12
या बंगल्याचे नावे नीलया आहे. या बंगल्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, सुंदर इंटेरिअर.
4 / 12
घराचा प्रत्येक कोपरा रवीनाने इतका सुंदर सजवला आहे की, तिच्या या घराच्या प्रेमात कोणीही पडेल.
5 / 12
घरात आर्टिस्टिक, अ‍ॅन्टिक वस्तू पाहताना तुम्ही भान विसरता.
6 / 12
घराच्या चहूबाजुंनी हिरवळ बघायला मिळते. काळ्या, लाल आणि ग्रे दगडांनी घराबाहेरील भाग सुशोभित करण्यात आला आहे.
7 / 12
या मोकळ्या जागेत एक मंदिर सुद्धा आहे. याठिकाणी गणपती बाप्पाची एक सुंदर रेखीव मूर्ती तुमचे लक्ष वेधून घेतले.
8 / 12
वास्तूशास्त्रानुसार हे मंदिर बनवण्यात आले आहे. सूर्यप्रकाश थेट येऊ शकेल, अशा पद्धतीने मंदिराची रचना करण्यात आली आहे.
9 / 12
निसर्गाशी जवळीक आणि आधुनिक सुखसुविधा यांचा सुंदर मेळ या घरात दिसतो.
10 / 12
घरातले देवघर लक्ष वेधून घेते.
11 / 12
रवीनाला केरळमधील घरांप्रमाणे तिचे घर सजवायचे होते. याच घरांपासून प्रेरणा घेत, तिने तिचे घर डिझाईन केले आहे.
12 / 12
मुंबईसारख्या शहरांमध्ये क्वचितच हिरवळ बघायला मिळते. पक्ष्यांची किलबिल तर दूर. मात्र रवीनाच्या घरात तुम्ही पक्ष्यांची चिवचिवाट सहज ऐकू शकता
टॅग्स :रवीना टंडन