By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 17:37 IST
1 / 11तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या गॅरेजमध्ये एकापेक्षा एक लक्झरी कार उभ्या असतात.यासोबतच त्याच्याकडे आहे व्हॅनिटी व्हॅन. 2 / 11खरेतर कलाकारांना व्हॅनिटी व्हॅनची आवश्यकता भासते. कारण ते शूटिंगच्या वेळी खूप व्यग्र असतात आणि त्यांचा जास्तीत जास्त वेळ शूटिंग लोकेशनवर व्यतित होतो. त्यामुळे त्यांना आराम करण्यासाठी किंवा महत्त्वाचे काम करण्यासाठी व्हॅनिटी व्हॅनची गरज पडते.3 / 11अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन रेग्युलर व्हॅनिटी व्हॅनपेक्षा खूप वेगळी आहे. त्याने ती कस्टमाइज्ड व डिझाईन करून घेतली आहे.4 / 11अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हॅनिटी व्हॅनसोबतचा फोटो शेअर केला होता.5 / 11अल्लू अर्जुनच्या या व्हॅनिटी व्हॅनची किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहेत.6 / 11 तसेच या व्हॅनवर ‘AA’ असा लोगोदेखील पहायला मिळतोय. 7 / 11या व्हॅनचा रंग काळा असून आतदेखील काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.8 / 11अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल सांगायचं तर तो एए१९चित्रपटात दिसणार आहे.9 / 11या चित्रपटात त्याच्यासोबत मोहेंजोदारो फेम अभिनेत्री पूजा हेगडेदेखील झळकणार आहे.10 / 11अल्लू अर्जुनच्या या व्हॅनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते11 / 11