Join us  

Ileana D'Cruz : स्वत:च्या शरीराचा तिरस्कार अन् झोपेत चालण्याची सवय; हैराण करतील इलियानाचे 'हे' किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 12:30 PM

1 / 10
मोठ्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्री इलियाना डिक्रूझचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 1 नोव्हेंबर 1987 रोजी मुंबईत झाला. अगदी लहान वयात अभिनयाच्या जगात तिने प्रवेश केला. इलियानाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली.
2 / 10
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिला अभिनयाच्या जगात प्रवेश करण्याची संधी मिळाली. इलियानाने तिच्या अभिनय कारकिर्दीला दक्षिण भारतीय चित्रपटांमधून सुरुवात केली. 'देवासू' हा तिचा पहिला चित्रपट होता, ज्यासाठी तिला दक्षिणेतील सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
3 / 10
देवासूनंतर इलियानाने 'पोकरी', 'किक', 'जुलै' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. साऊथमध्ये यश मिळवल्यानंतर इलियाना डिक्रूझ बॉलिवूडकडे वळली. तिचा पहिला हिंदी चित्रपट 'बर्फी' हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
4 / 10
अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटासाठी इलियानाला बेस्ट डेब्यू एक्ट्रेसचे चार पुरस्कार मिळाले. यानंतर ती 'मैं तेरा हीरो', 'रेड' आणि 'बादशाहो' इत्यादी चित्रपटांमध्ये दिसली. ती अभिषेक बच्चनसोबत 'द बिग बुल'मध्ये दिसली होती.
5 / 10
आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावणारी इलियाना डिक्रूज सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. लाखो लोक तिला फॉलो करतात. काही वर्षांपूर्वी, अभिनेत्रीने ट्विटरवर स्वतःबद्दल असं काहीतरी सांगितलं होतं. ज्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले.
6 / 10
इलियानाने खुलासा केला होता की, तिला झोपेत चालण्याची सवय आहे. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ती रात्री झोपेत चालते हे तिने जवळजवळ मान्य केलं आहे.
7 / 10
इलियाना डिक्रूजला तिच्या शरीराचा खूप तिरस्कार करते, हे ऐकून हैराण व्हाल पण तिने स्वत:च याबाबत देखील खुलासा केला आहे. इलियानाने सांगितलं होतं की, तिला तिचं शरीर आवडत नाही. अशा स्थितीत तिला स्वतःला आरशात पाहावसं वाटत नाही.
8 / 10
या प्रकरणात, तज्ञांनी सांगितलं होतं की ही एक मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये संबंधित व्यक्तीला आपल्या शरीरात दोष आढळतात. यामुळे त्रस्त लोकांचे शरीर कितीही सुंदर आणि आकर्षक असले तरी ते नेहमी स्वत:मधील कमतरता शोधत राहतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 10
10 / 10
टॅग्स :इलियाना डीक्रूजबॉलिवूड