Join us  

उर्वशी रौतेलाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी केला होता हा खुलासा, वाचून बसेल धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 6:41 PM

1 / 8
‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते.
2 / 8
आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणा-या उर्वशीने 2011 मध्ये मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.
3 / 8
‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली.
4 / 8
भाग जानी, सनम रे अशा चित्रपटात ती दिसली. ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
5 / 8
उर्वशीने काही महिन्यांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, माझा एक्स-बॉयफ्रेंड मला अगदी प्रिन्सेससारखा ट्रिट करायचा. पण असे असताना नेमके कुठे बिनसले हे मात्र आम्हाला ठाऊक नाही.
6 / 8
उर्वशीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी या मुलाखतीत सांगितले असले तरी त्याचे नाव घेणे तिने टाळले होते.
7 / 8
काही वर्षांपूर्वी क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि तिच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती.
8 / 8
उर्वशी तिच्या अभिनयापेक्षा सौंदर्यासाठी जास्त ओळखली जाते.
टॅग्स :उर्वशी रौतेला