Join us  

एक कोटीचं घड्याळ अन् महिन्याला ४२ कोटींची कमाई; Honey Singh चं नेटवर्थ पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:00 PM

1 / 11
आपल्या हटके स्टाइल आणि रॅपसाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध गायक म्हणजे हनी सिंग.
2 / 11
हनी सिंगच्या गाण्यांची जितकी चाहत्यांमध्ये चर्चा होत असते, त्याच्यापेक्षा कैकपटीने त्याच्या पर्सनल लाइफची चर्चा रंगताना पाहायला मिळते.
3 / 11
हनी सिंग समावेश आज श्रीमंत गायकांच्या यादीत केला जातो. विशेष म्हणजे तो प्रचंड लक्झरी लाइफ जगतो. त्यामुळेच त्याचं नेटवर्थ किती आहे ते पाहुयात.
4 / 11
हनी सिंहचं खरं नाव हिरदेश सिंह असं असून कलाविश्वात येण्यापूर्वी त्याने त्याचं नाव बदललं.
5 / 11
सुरुवातीच्या काळात यूट्यूब व्हिडीओपासून करिअरची सुरुवात करणारा हनी सिंह आज कोट्यावधींचा मालक आहे.
6 / 11
हनी सिंगला महागड्या वस्तू वापरण्याची आवड असून तो चक्क १ कोटी रुपयांचं घड्याळ वापरतो.
7 / 11
हनी सिंहला गाड्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये ऑडी क्यू 7, ऑडी आर8, जेगुआर,रोल्स, बीएमडब्ल्यू यांचा समावेश आहे.
8 / 11
हनी सिंहचं नोएडामध्ये घर आहे. तसंच पंजाबमध्येही त्याने ३ कोटींचं घर घेतलं आहे. विशेष म्हणजे गुडगांव, दिल्ली आणि मुंबई येथेही त्याची आलिशान घरं आहेत.
9 / 11
मीडिया रिपोर्टनुसार, रॅपर हनी सिंह दरवर्षी साधारण ४२ कोटी रूपयांच्या आसपास कमाई करतो.
10 / 11
हनी सिंग एका गाण्यासाठी १५ लाख रुपये मानधन घेतो. त्यामुळे देशात सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश आहे.
11 / 11
हनी सिंहकडे २५ मिलियन यूएस डॉलरची संपत्ती असून भारतीय चलनानुसार ही रक्कम १७३ कोटी रूपयांच्या आसपास होते.
टॅग्स :हनी सिंहबॉलिवूडसेलिब्रिटी