Join us  

Birthday Special : तुम्ही कधीही पाहिले नसतील असे अमिताभ बच्चन यांचे दुर्मिळ फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 8:00 AM

#Happy Birthday Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस.

आजही तरूण कलाकारांना लाजवतील अशी कामगिरी करणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. संघर्षाच्या काळात मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अनेक रात्री काढावे लागणारे अमिताभ आज बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ म्हणून ओळखले जातात.   अमिताभ यांना एकेकाळी इंजिनिअर व्हायचे होते. एवढेच नाही तर त्यांनी वायू दलात जाण्याचेही ठरवले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अमिताभ अभिनेते बनले आणि भारतीय चित्रपटसृष्टीला ‘शहेनशहा’ मिळाला. आज अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही दुर्मिळ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत... तेव्हा पाहा तर...

बच्चन कुटुंबातील बच्चे कंपनीसोबतचा अमिताभ यांचा हा फोटो कदाचितच तुम्ही पाहिला असेल.

आई तेजी बच्चन यांच्यासोबतचा अमिताभ यांचा एक दुर्मिळ फोटो...

अमिताभ आणि अभिषेक या पितापुत्राचा हा फोटो पहायलाच हवा.

वडील हरिवंश राय बच्चन, आई तेजी बच्चन, भाऊ अजिताभ बच्चन यांच्यासोबतचा हा एक दुर्मिळ फोटो.

 कुलीच्या सेटवरील जीवघेण्या अपघातानंतर अमिताभ यांचा जणू दुसरा जन्म झाला. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर अमिताभ सहीसलामत रूग्णालयातून बाहेर पडले तेव्हाचा हा फोटो

अमिताभ बच्चन क्रिकेट खेळतांना

 

बच्चन कुटुंब

 

 

टॅग्स :अमिताभ बच्चन